जळगावात विद्यापीठाची ४ ठिकाणी जिल्हास्तरीय अविष्कार स्पर्धा

jalgaon 6

 

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जिल्हास्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेचा मान येथील नूतन मराठा महाविद्यालयाला मिळाला असून स्पर्धेचे सोमवारी (दि.३०) रोजी सकाळी १० वाजता पुणे येथील डीआरडीओ येथील शाखज्ञ डॉ. प्रसाद नाईक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असून विद्यापीठाची ४ ठिकाणी अविष्‍कार स्पर्धा घेण्यात येत आहे.

यात जळगाव जिल्ह्याचे स्पर्धा नूतन मराठा महाविद्यालयात होत असून उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील आहेत. प्रसंगी संस्थेचे चेअरमन निलकंठ काटकर, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद समितीचे सदस्य दिलीप पाटील, दीपक पाटील, डॉ.प्रीती अग्रवाल, डॉ.सुभाष चौधरी, प्रा.डॉ.नितीन बारी यांच्यासह प्रा.डॉ.जे.बी.नाईक, प्रा.डॉ.एल.पी देशमुख उपस्थित राहणार आहेत.

स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील ४९ महाविद्यालयांमधील १ हजार ३२७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे यात १०२ मॉडेल व ६१५ पोस्टर सादरीकरण होणार आहे. स्पर्धा पदवी, पदव्युत्तर, पदवी व शिक्षक अशा चार विभागात होणार असून पोस्टर, मॉडेलव्दारे विद्यार्थी आपल्या संशोधनाचा विषय मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषेत सादर करणार आहे. या स्पर्धेत सहा गट तयार करण्यात आले आहेत. त्यात पहिल्या गटात सामाजीकशास्त्रे, भाषा, मानव्यविद्या, ललित कला, दुस-या गटात वाणिज्य, व्यवस्थापन आणि विधी, तिस-या गटात विज्ञान शाखा, त्यात भौतिक शास्त्र, जीवन शास्त्र, गणित, पर्यावरणशास्त्र, गृह आणि संगणकशास्त्र आहेत. चौथ्या गटात कृषी व पशुसंवर्धन, पाचव्या गटात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, सहाव्या गटात औषधनिर्माण शास्त्र यांचा समावेश आहे.

स्पर्धेसाठी मुख्य नियोजन समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.एस.पी देशमुख असून सदस्य डॉ.एस.ए. गायकवाड, डॉ.ए.वाय बडगुजर, डॉ.एन, जे.पाटील, डॉ.एन.एम पाटील, डॉ.अफाक रेख, टो डी.एल.पाटील हे आहेत. याशिवाय १८ उपसमित्या कार्यरत आहेत. विद्याथ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मदत संपर्क कक्ष देखील स्थापन करण्यात आला आहे.

Protected Content