अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरूणाला अटक; एमआयडीसी पोलीसांची कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील शिरसोली गावातील एका भागात राहणारी अल्पवयीन मुलीला पळवून नेत मंदीरात लग्न करून अत्याचार केल्याचा घटना घडली आहे. अत्याचारातून पिडीत मुलीने मुलाला जन्म दिला असून संशयित आरोपीला एमआयडीसी पोलीसांनी अटक केली. याप्रकरणी शनिवारी २९ जुलै रोजी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनिल दलू बारेला (वय-२४) रा. तोंडापूर ता. जामनेर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील शिरसोली गावातील एका भागात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. संशयित आरोपी सुनिल बारेला याने २५ सप्टेंबर २०२१ रोजी रात्री ११ वाजता अल्पवयीन मुलीला पळवून नेले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सुरूवातील बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, अल्पवयीन मुलीला पळवून नेत जामनेर तालुक्यातील तोंडापूर गावातील एका देवीच्या मंदीरात लग्न केले. त्यानंतर गावातील एका शेतात राहून पिडीत मुलीवर अत्याचारकेला. या अत्याचारातून पिडीत मुलीने मुलगा गौरव (वय-११ महिने) याला जन्म दिला. त्यानंतर पोलीसांनी केलेल्या तपासानंतर एमआयडीसी पोलीसांनी संशयित आरोपी सुनिल बारेला याला अटक केली. त्यात एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात पोक्सोचे कलम वाढविण्यात आले. संशयित आरोपी याला शनिवारी २९ जुलै रोजी दुपारी २ वाजता जळगाव जिल्हा न्यायालयाचे न्यायमुर्ती सुरज केंद्रे यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील सुरेंद्र काबरा करीत आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गिरासे करीत आहे.

Protected Content