अवैध वाळू वाहतूकीची आयोगाने घेतली दखल; पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  गिरणा नदी पात्रातून वाळूची वाहतूक होत असल्याबाबत प्रसारमाध्यमातून बातमी प्रसारीत करण्यात आली होती. याची दखल घेत महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाने दखल घेत गुन्हा दाखल करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार शनिवारी २९ जुलै रोजी रात्री १० वाजता मंडळाधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात वाळू वाहतूकदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गिरणा नदी पात्रातून अवैधरित्या बेसुमार वाळू वाहतूक होत असल्याबाबत जून २०२२ मध्ये प्रसाद माध्यामात जळगाव जवळ नादीपात्रा वाळू माफियांची जत्रा, प्रशासनाला गिरणाची चाळण दिसत नाही का ? या मथळ्याखाली फोटोसहीत बातमी प्रसिध्द केली होती. यात मे आणि जून २०२२ याच्या कालावधीत जळगाव शहरानजीक असलेल्या गिरणा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळू वाहतूक केली जात होती. त्या बातमीची दखील महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाने घेतली. याबाबत केस दाखल करून घेत याबाबत कारवाई करण्याच्या सुचना जळगाव महसूल विभागाला देण्यात आले. दरम्यान पिंप्राळा विभागाचे मंडळाधिकारी किरण खंडू बाविस्कर यांनी शनिवारी २९ जुलै रोजी रात्री १० वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात वाळू वाहतूकदारांवर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील करीत आहे.

 

Protected Content