डांभुर्णी येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर महसुल पथकाची कारवाई

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील डांभुर्णी गावात महसुलच्या भरारी पथकाने धडक कारवाई करीत तापी नदीच्या पात्रातुन अवैध मार्गाने वाळु वाहतुक करतांना एका ट्रॅक्टरला पकडण्यात आले आहे. महसुलच्या या धडक कारवाईमुळे वाळु माफी धाबे दणाणले आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, डांभुर्णी तालुका यावल येथे आज ९ मार्च रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार आणी फैजपुर मंडळाचे तलाठी प्रशांत जावळे, आमोदे येथील तलाठी एम.पी.खुर्दा, आडगावचे तलाठी आर.के.गोरटे, वाहनचालक हिरामण सावळे यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत ट्रॅक्टर मालक साहेबराव मच्छिंदर सोळुंके रा. कोळन्हावी यांच्या मालकीचे ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९ एपी ७४९७) ट्रॉलीचा क्रमांक नाही. याव्दारे तापी नदीच्या पात्रातुन अवैधरित्या वाळुची वाहतुक करतांना आढळून आले आहे. महसुलच्या पथकाने कारवाई करीत ट्रॅक्टर ताब्यात घेवुन यावल पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले आहे. दरम्यान यावल तालुक्यातही बऱ्याच ठिकाणी बेकायदेशीर वाळूची वाहतूक होत असल्याने त्यांचाही बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातून होत आहे.

Protected Content