Home Cities अमळनेर बाम्हणे विकासो चेअरमनपदी गणेश भामरे

बाम्हणे विकासो चेअरमनपदी गणेश भामरे

0
187


अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील बाम्हणे विकासो चेअरमनपदी गणेश भामरे तर व्हाईस चेअरमनपदी बारीकराव पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.

यावेळी पराग पाटील, धनराज पाटील, यादव सनेर, वसंत पाटील, शांताबाई पाटील, कलाबाई पाटील, युवराज पाटील, नवल पाटील व देविदास पाटील हे सदस्य उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर.यु.पाटील यांनी काम पाहिले तर सचिव कैलास पाटील यांनी त्यांना सहकार्य केले.

यावेळी विजय पाटील, हिरालाल पाटील, चंद्रकांत पाटील, प्रविण पाटील, भिकन पाटील, संतोष पाटील, राजेंद्र पाटील, यशवंत पाटील, जगदीश पाटील, रमेश पाटील, आधार पाटील, दत्तात्रेय पाटील, दिनेश पाटील, संजय पाटील, सुनिल पाटील, मोतीलाल पाटील, दिनेश पाटील, किशोर पाटील, रविंद्र मिस्तरी, भैय्यासाहेब पाटील, नितीन पाटील, रमेश पाटील, सुनिल पाटील, अमृत पाटील, दिनेश पाटील, मधुकर पाटील, कैलाश पाटील, देविदास नेरकर, दुर्योधन नेरकर, संजय पाटील, प्रकाश पाटील, विनोद पाटील यांच्या सह ग्रामस्थ मंडळींचे अनमोल सहकार्य लाभले.

आमदार अनिल पाटील, माजी आ.स्मिताताई वाघ, भाजपाच्या जेष्ठ नेत्या ऍड.ललिता पाटील, जिल्हा परिषद सदस्या जयश्रीताई पाटील, मार्केट मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील, पंचायत समितीचे उपसभापती भिकेश पाटील, काँग्रेसच्या शेतकरी आघाडीचे सुभाष सुकलाल पाटील, कृऊबा माजी संचालक पराग पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील तसेच धुळे काँगेसचे नेते व महिंदळेचे सरपंच दिनेश पाटील यांनी गणेश भामरे यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

सहकारातील युवा नेतृत्व

केशवा आयटी व्हिजन चे संचालक गणेश भामरे यांनी मागील काही काळापासून सहकार क्षेत्रात आपला ठसा उमटवलेला आहे,बाम्हणे ग्रामपंचायतीचे ते विद्यमान सदस्य असून २०११ ते २०१६ दरम्यान त्यांनी विकासो च्या संचालक पदाची धुरा यशस्वीरित्या सांभाळलेली आहे.


Protected Content

Play sound