घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या तरुणाला अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घरगुती गॅसचा काळाबाजार करून वाहनात भरणाऱ्या एका तरुणावर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याच्याकडून गॅस सिलेंडर, वजनकाटा, मशीन असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी सोमवारी २९ मे रोजी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अब्दुल खालीद अब्दुल करीम (वय-२९, रा.फातिमानगर, एमआयडीसी जळगाव) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरात अनेक ठिकाणी घरगुती गॅसचा काळाबाजार करून अवैधरित्या खाजगी वाहनांमध्ये भरून वापर केला जात आहे. या अनुषंगाने एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातील पोलीस कॉलनीजवळील एका रिक्षा स्टॉपजवळ संशयित आरोपी अब्दुल खालिद अब्दुल करीम हा घरगुती गॅसचा वापर खाजगी वाहनांमध्ये बेकायदेशीर दिल्या भरून काळाबाजार करत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतली असून त्याच्याजवळ असलेले गॅस सिलेंडर, गॅस भरणारे साहित्य असा एकूण ३४ हजार ३०० रुपये किमतीच्या मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलीस नाईक प्रीतम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अब्दुल खालिद अब्दुल कलाम यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहे.

Protected Content