ट्रकमधील साहित्याची चोरी करणारे दोघांच्या आवळल्या मुसक्या; स्थानिक गुन्हे पथकाची कामगिरी

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । ट्रकमधून साहित्याची चोरी करणार्‍या दोघांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी मुसक्या आवळल्या. दोघांकडून सुमारे १९ लाख रुपयांचा मुद्देमाला हस्तगत करण्यात आला असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रकमधील साहित्य चोरीच्या दोन घटना जिल्ह्यात घडल्याने पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी या घटनांची चौकशी करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या
होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी  वेगवेगळी पथक तयार करुन चौकशीसाठी रवाना केले होते. त्यानुसार पथकाला पहूर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील संशयीत आरोपी मोबीन अहमद पटेल वय-४७ रा. भादली हा ह. मु. कोंढवा पुणे येथे राहत असल्याची माहिती मिळाली. पथकाने पुणे येथे जावून गुरुवारी संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे १० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

दुसर्‍या संशयीताकडून ९ लाखाचा मुद्देमाल हस्तगत
ट्रकमधील साहित्याची चोरी केल्यानंतर मोबीन अहमद पटेल याने तो माल त्याचा ओळखीचा इकबाल उर्ङ्ग इकबाल टेलर अन्वर पटेल वय-४८ रा. रजा कॉलनी शेरा चौक यांना विकल्याचे चौकशीत समोर आले. त्यानुसार संशयीत आरोपीस इकबाल
अन्वर पटेल याला शुक्रवारी अटक केली. त्याच्याकडून सुमारे ९ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

दुसर्‍या चोरीची देखील दिली कबुली
या घटनेत दोघ संशयीत आरोपींकडून सुमारे १९ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत क
रण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्या दोघ संशयितांना पहुर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. तसेच यातील संशयिता आरोपी इकबाल उर्ङ्ग इकबाल टेलर अन्वर पटेल याची कसून चौकशी केली असता, त्याने एमआयडीसीत केलेल्या चोरीची देखील कबुली दिली आहे.

Protected Content