निमखेडी शिवारातील विवाहितेचा दोन लाखासाठी छळ

 

जळगाव प्रतिनिधी । पतीला नोकरी लावण्यासाठी शहरातील निमखेडी शिवारात राहणाऱ्या विवाहितेच्या आईवडीलांनी दोनलाखाची मागणीची पुर्ण न केल्यामुळे विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या पुणे येथील पतीसह सासरकडील सहा जणांविरूध्द जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील निमखेडी शिवारातील शुभांगी महेश वैद्य (वय-३०) यांचा विवाहितेचा महेश आनंदा वैद्य रा. वडगाव शेरी पुणे यांच्याशी विवाह झाला आहे. लग्नानंतर सुरूवातीचे सात महिने सुखाने गेले. त्यानंतर मात्र पती महेश वैद्य याने विवाहितेवर चरित्र्याचा संशय घेवून शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर सासू त्रीवेणी आनंदा वैद्य, सासरे आनंदा सदाशिव वैद्य, ननंद ममता अभिजित कदम, ननंद सविता संदीप गाढे आणि मामसासरे विवेकानंद रामनाथ थुल सर्व रा. वडगाव शेरी यांनी पती महेश वैद्य याला नोकरी लावण्यासाठी माहेरहुन दोन लाख रूपये आणावे यासाठी विवाहितेला शिवीगाळ व दमदाटी करून गांजपाट केला. हा प्रकार विवाहितेला सहन न झाल्याने विवाहिता ८ जानेवारी २०२१ रोजी माहेरी निघून आल्या. विवाहितेच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीसात पतीसह सासरकडील एकुण ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विश्वनाथ गायकवाड करीत आहे.

Protected Content