बुद्ध पौर्णिमानिमित्त युवा बौद्ध पंच मंडळातर्फे अन्नदान

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील कोरपावली येथील युवा बौद्ध पंच मंडळाच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध वैशाख बुद्ध पौर्णिमानिमित्त सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या दुर्गम क्षेत्रातील पांढरी वस्तीत अन्नदान करण्यात आले. 

कोरपावली तालुका यावल येथील ग्राम पंचायतचे तरूण तडफदार सरपंच विलास अडकमोल यांच्या मार्गदर्शनाखाली व काँग्रेस कमेटीचे प्रदेश प्रतिनिधी उमेश जावळे यांच्या उपस्थितीत तसेच बुद्ध जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रोहीत अडकमोल, देविदास तायडे , अरूण भालेराव , भिमराव इंधाटे, विनोद अडकमोल , मनोज अडकमोल पकंज तायडे , विशाल इंधाटे यांच्यासह न्यु माता रमाई महीला मंडळकोरपावली च्या अध्यक्ष मनिषा पांडव , कल्पना अडकमोल, ज्योत्सना अडकमोल आदी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत प्रथम भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेचे पुजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी सरपंच विलास अडकमोल , काँग्रेसचे प्रदेश सदस्य उमेश जावळे यांच्यासह समाज बांधवांनी महत्वाचे परिश्रम घेतले.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.