यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।यावल बसस्थानक परिसरातून अज्ञात चोरट्यांनी एका महिलेच्यास गळ्यातील सोन्याची पोत चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिनाक्षी जितेंद्र पाटील (वय ३० वर्ष, रा. दहिगाव, ता. यावल) या १२ मे रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास यावल बस स्थानक परिसरात काही कामासाठी आल्या होत्या. यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे १२ हजार रुपये किमतीच्या ३ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या वाट्या आणि सोन्याचे तीन मणी असलेली पोत अत्यंत शिताफीने तोडून चोरून नेली. दागिने चोरीला गेल्याचे लक्षात येताच मिनाक्षी पाटील यांनी तत्काळ यावल पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ सुनील पाटील हे करीत आहे.




