Home Uncategorized वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर पोलीसांचा छापा; गुन्हा दाखल

वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर पोलीसांचा छापा; गुन्हा दाखल

0
100


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. फुफणी ते किनोद दरम्यान रात्रीच्या सुमारास विनापरवाना वाळू वाहतूक करणारा एक डंपर पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईत सुमारे २ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, ११ मे रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास फुफणी-किनोड रोडवर एका विना नंबरच्या फिक्कट निळ्या रंगाच्या टाटा कंपनीच्या डंपरमधून अवैध वाळूची वाहतूक केली जात होती. पोलीस गस्तीवर असताना हा डंपर संशयास्पदरीत्या आढळला. पोलिसांना पाहताच कारवाईच्या भीतीने अंधाराचा फायदा घेऊन डंपर चालक घटनास्थळावरून पळ काढण्यात यशस्वी झाला.

या कारवाईत पोलिसांनी ३००० रुपये किमतीची सुमारे १ ब्रास वाळू आणि २ लाख रुपये किमतीचा टाटा डंपर असा एकूण २ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. फरार चालकाचा शोध सुरू असून, सदर डंपर जळगाव तालुका पोलीस स्टेशनला आणण्यात आला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हवालदार योगेश पाटील करत आहेत.


Protected Content

Play sound