यावल महाविद्यालयात महिला दिनानिमित्त ॲड. जास्वंदी भंडारी यांचे कायदे विषयावर मार्गदर्शन

यावल प्रतिनिधी । येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात 8 मार्च रोजी युवती सभेतर्फे जागतिक महिला दिन ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून भुसावळ बार असोसिएशनच्या महिला प्रतिनिधी ॲड.जास्वंदी भंडारी उपस्थित होत्या तर अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांनी भूषविले.

सदर समारंभात ॲड. जास्वंदी भंडारी यांनी ‘महिला विषयक कायदे’ या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन सादर केले .आपले विचार व्यक्त करताना त्यांनी असे नमूद केले की प्रत्येक महिलेला गर्भात असतानाच अधिकार प्राप्त होतो परंतु पुरुष प्रधान संस्कृती ‘, स्त्री-पुरुष असमानता व लिंगभेद त्यामुळे स्त्रीला आपला मूलभूत अधिकार प्राप्त करण्यासाठी आजीवन संघर्ष करावा लागतो. याप्रसंगी त्यांनी बाल विवाह व लैंगिक शोषणावर प्रकाश टाकत महिलांविषयी कायद्यांचे कलमवार विवेचन केले .आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ .संध्या सोनवणे यांनी महिला दिनाची पार्श्वभूमी विशद केली .त्यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, प्रत्येक स्त्रीमध्ये जन्मजात विविध क्षमता असतात. प्रत्येकीने या क्षमता विकसित करणे काळाची गरज आहे .आज विविध क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत. महिला दिन म्हणजे महिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे असे देखील त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ .सुधा खराटे यांनी तर आभार प्रदर्शन जयश्री पाटील हिने मानले.

कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थिनी ,परिसरातील महिला, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य प्रा. एम.डी. खैरनार ,प्रा .संजय पाटील ,डॉ .सुधीर कापडे ,डॉ .प्रल्हाद पावरा व प्रा .एस. आर. गायकवाड, प्रा.विजय पाटील यांनी परिश्रम घेतले.

Protected Content