उष्णतेच्या लाटेची चाहूल; वाढत्या तापमानात घ्या काळजी

शेअर करा !

जळगाव प्रतिनिधी । एकीकडे कोरोनाची रूग्णसंख्या वाढीस लागत असतांना जिल्ह्यात Temperature In Jalgaon पारा चढल्याचे दिसून येत असून येत्या काही दिवसांमध्ये तापमानात वाढ होणार असल्याचे हवामान खात्याने सूचित केले आहे.

मध्यंतरी जळगाव शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागाला अवकाळी पावसाचा फटका पडला होता. यामुळे काही दिवसांपुरती तापमानात घट आली होती. मात्र दोन दिवसांपासून तापमान पुन्हा वाढीस लागल्याचे दिसून येत आहे. आज शहरातील कमाल तापमान Temperature In Jalgaon हे ४० अंश राहिल असे हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार स्पष्ट झालेले आहे.

दरम्यान, याच प्रमाणे येत्या काही दिवसांमध्ये तापमान वाढीचा वेग कायम राहणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. यात १ मार्च रोजी ४२ अंश तर ३ मार्च रोजी तब्बल ४५ अंश इतके कमाल तापमान राहिल असे भाकित करण्यात आलेले आहे. यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासूनच शहरात उष्णतेची लाट येणार असल्याचे अधोरेखीत झाले आहे. तर याच प्रमाणे एप्रिल महिन्यात तापमानाचा पारा हा कायम ४० अंशाच्या वरच राहणार असल्याचेही हवामान खात्याने दर्शविले आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!