बापरे….अंत्यविधीसाठी स्मशानभूमित जागाच नाही !

जळगाव प्रतिनिधी । शहरात कोरोनामुळे मृत झालेल्यांची संख्या वाढत असून अंत्यसंस्कार करण्यासाठी नेरी नाका Neri Naka येथील स्मशानभूमित जागाच नसल्याने प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ आली.

जिल्हाधिकार्‍यांनी अलीकडेच नेरी नाका Neri Naka स्मशानभूमिला कोविड रूग्णांसाठी पुन्हा एकदा अधिग्रहीत केले आहे. अर्थात, कोविडमुळे मृत झालेल्यांच्या पार्थिवावरच येथे अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. यात काही तालुका पातळीवरील मृत झालेल्या रूग्णांवर देखील येथील अग्नीसंस्कार करण्यात येत आहेत. यामुळे स्मशानभूमित जागाच खाली नसल्याचे गत काही दिवसांपासून दिसून येत आहे.

दरम्यान, गुरूवारी सायंकाळ पासून तर अग्नीडाग देण्यासाठी जागाच नसल्याने स्मशानभूमिला चक्क कुलूप लावण्यात आले. यानंतर सायंकाळी जळगाव शहरातील दोन महिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे त्यांचे आप्त अंत्यसंस्कार करण्यासाठी पार्थिव नेरीनाका स्मशानभूमित घेऊन आले. मात्र येथे प्रवेशद्वारालाच कुलूप लावण्यात आल्याने त्यांना मध्ये जाता आले नाही. गुरूवारी दिवसभरात नेरी नाका येथील स्मशानभूमित तब्बल १८ जणांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यामुळे स्मशानभूमित जागाच शिल्लक नसल्याने कुलूप लावण्याची पहिल्यांदाच वेळ आली आहे.

Protected Content