दारू अड्डावर धाड; तीन जणांविरूध्द गुन्हा

पहूर , ता. जामनेर प्रतिनिधी । येथील पोलिसांच्या पथकाने तालुक्यातील चिलगाव आणि पाळधी येथील अवैध दारू अड्डयावर धाड टाकून तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाळधी गावात छाडेकर गल्लीत गुप्त माहितीच्या आधारे गावढी हातभट्टीची तयार १७लिटर तयार दारू ( १८०० रु . किमतीची ) नष्ट केली. या प्रकरणी
सचिन छाडेकर रा. पाळधी यास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध पहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

पोलिस निरीक्षक राहुल खताळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप चौधरी, ईश्‍वर देशमुख होमगार्ड इंगळे, जाधव, दांडगे यांच्या पथकाने सदर कारवाई केली. याशिवाय, पोलीस निरीक्षक राहुल खताळ ,पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे , जितूसिंग परदेशी , होमगार्ड शंकर भोई , कलीम शेख मोमीन यांच्या पथकाने पहूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिलगाव शिवारात तलावाकाठी झाडाझुडुपांमध्ये दोन ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून मध्य साठा असलेले ११ पत्री ड्रम , १० हजार रुपये किमतीची गावठी हातभट्टीची शंभर लिटर तयार दारू तसेच २२ हजार रुपये किमतीचे दारूचे कच्चे -पक्के २२०० लिटर रसायन असे एकूण ३२ हजार रुपयांची गावठी दारू नष्ट करून- शकलाल सांडु तडवी (रा. चिलगाव )हुसेन सरदार तडवी (रा. चिलगाव ) यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

पहूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहूल खताळ व त्यांचा पथकाने केलेल्या कारवाईचे कौतुक होत आहे .पहूर परिसरात बिनदिक्कीतपणे उघड्यावर होत असलेल्या अवैध दारू विक्री मुळे अनेक तरुणांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत . काही जणांना तर आपल्या प्राणांनाही मुकावे लागले आहे. परिणामी त्यांची कुटुंब उघड्यावर आले आहे . तरुण मुलेही दारूच्या व्यसनाच्या आहारी जात आहेत.दारूच्या आहारी गेल्यामुळे त्यांच्या हातून नकळत इतर गुन्हे घडतांना दिसतात. त्यामुळे राजरोसपणे सुरू असलेली अवैध दारू विक्री बंद करावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.

Protected Content