निवडणूक प्रचारासाठी माकप करणार एआय वापर

कोलकाता-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा | पश्चिम बंगालमध्ये पक्षाच्या प्रचारासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय तंत्रज्ञानाचा उपयोग करणार आहे. पक्षाने प्रचारमोहिमेच्या बातम्या आणि लोकांच्या हिताच्या बाबी प्रसारित करण्यासाठी एआय एँकरची निर्मिती केली आहे. हे अँकर पात्र महिला आहे. तिचे नाव पक्षाने समता असे ठेवले आहे.

प्रथमत: पश्चिम बंगालमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सोशल मीडिया अकांउटवर समता अँकर बंगाली भाषेत लोकांना माहिती देईल. त्यानंतर इतर राज्यामध्ये हिंदी आणि इंग्रजीचा वापर करण्यात येणार आहे. ही माहिती पीटीआयशी बोलताना माकप नेते सामिक लाहिरी यांनी दिली. ते माकपच्या मध्यवर्ती समितीचे सदस्य आहे. ते पक्षाच्या या नवीन प्रकल्पावर काम करत आहेत.

 

Protected Content