पोलीस शिपाई पद भरतीसाठी अर्ज करण्यास १५ एप्रिल पर्यंत मुदतवाढ

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पोलीस शिपाई संवर्गातील पदांसाठी 31 मार्च पर्यंत अर्ज सादर करण्यासाठी Mahait यांच्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. परंतु राज्य शासनाने नुकतेच मराठा आरक्षण विधेयक संमत केले आहे. त्यासाठी उमेदवारांना लागणारे SEBC प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्यामुळे सर्व उमेदवारांना अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १५ एप्रिल, २०२४ पर्यंत करण्यात येत आहे.

अंतिम दिनांकापुर्वी उमेदवारांना तांत्रिक अडचणींमुळे प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्यास प्रमाणपत्र अर्जाची पोचपावतीसह अर्ज सादर करावा. मात्र कागदपत्र पडताळणीवेळी विहित नमुन्यातील सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे. असे आवाहन राजकुमार व्हटकर, अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, म.रा., मुंबई यांनी केले आहे.

Protected Content