मोहाडी रोडवर तरूछाया प्रकल्पांतर्गत वृक्षारोपण

जळगाव प्रतिनिधी । शहरातील मोहाडी रोडवरील लांडोरखोरी उदयानापासून ते मोहाडी मंदीरापर्यंतच्या अंतरात तरूछाया प्रकल्पांतर्गत २५१ कडुलिंबाचे वृक्षारोपण आज मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले.

याप्रसंगी माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, उपायुक्त संतोष वाहुळे, उपायुक्त प्रशांत पाटील, वनसंरक्षक अधिकारी विवेक होशिंग, नारायण वाणी, गोसावी, देवीदास ढेकळे, मनोज चौधरी, डॉ. मारूती पोटे, डॉ बेंद्रे, डॉ. लीना बडगुजर, दिलीप वाणी, गणेश पाटील, अभय जैन, सुरेश जैन, मुकेश टेकवानी, ॲड. सागर चित्रे, मणियार बिरादरीचे फारुख शेख दिलबाग छाबडा, बंटी बुटवानी, शिरीष बर्वे, प्रकाश चौबे, शैलेश चव्हाण, अशोक मदाने, आनंद मराठे, वसंत पाटील, कुणाल बारसे, नरेश सोनवणे, प्रकाश पाटील, दिलीप सुरवाडे, संतोष क्षीरसागर, बाळू पाटील, सागर महाजन, महेश शिंपी, मराठी प्रतिष्ठान महिला मंडळ विश्वस्त प्रा.सविता नंदनवार, डॉ विद्या चौधरी, दीपाली पाटील, सुमित्रा पाटील, शिफा बागवान आरती व्यास आदी उपस्थित होते.  

कार्यक्रमाच्या प्रसंगी मराठा प्रतिष्ठानचे सचिव वनश्री यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व समजावून सांगितले. माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्याहस्ते ५० वृक्षप्रेमी नागरीकांना ‘वृक्षमित्र’ म्हणून सन्मानित करूनन प्रतिष्ठानतर्फे स्मृती चिन्ह देण्यात आले. यासाठी प्रतीक पलोड व डॉ. रवी महाजन यांनी या वृक्षारोपण प्रकल्पात रोपे दिली आहेत. कार्यक्रमाचे आभार मराठी प्रतिष्ठानचे ॲड. जमील देशपांडे यांनी मानले.

Protected Content