राहुल गांधींसह विरोधकांना काश्मीरमधून परत पाठवले

Rahul gandhi

 

श्रीनगर (वृत्तसंस्था) जम्मू काश्मीरमध्ये जाऊन येथील परिस्थितीचा आढावा घेत स्थानिक नेत्यांसह, सामान्य नागरिकांची काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि विरोधी पक्ष नेते भेट घेणार होते. मात्र, राहुल यांना श्रीनगर विमानतळावरुन शहरात जाऊ देण्यात आले नाही. सुरक्षेच्या कारणास्तव राहुलसह सर्व नेत्यांना परत दिल्लीला परत पाठविण्यात आले.

 

अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच काश्मीरचा दौरा करण्याचे ठरवले होते. त्यानुसार ते आणि त्यांच्यासोबत इतर विरोधी पक्षातील नेत्यांचे शिष्टमंडळही दिल्लीहून श्रीनगरला आज पोहचले. मात्र श्रीनगर विमानतळावर राहुल गांधी आणि इतर सगळ्या नेत्यांना रोखण्यात आले. राहुल गांधी आणि विरोधी पक्ष नेत्यांसह श्रीनगर विमानतळावरच रोखण्यात आले आणि तिथूनच त्यांना परत दिल्लीला पाठवण्यात आले. सुरक्षेच्या कारणास्तव राहुल गांधी आणि त्यांच्यासोबत आलेल्या विरोधी पक्ष नेत्यांच्या शिष्टमंडळाला माघारी पाठवण्यात आले.

 

जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राहुल गांधींना काश्मीरमध्ये येण्यासाठी निमंत्रण दिले होते. त्यानुसार, राहुल गांधी 11 नेत्यांसह श्रीनगरला पोहोचले. मात्र, राहुल हे श्रीनगर येथे पोहोचताच, काही गोंधळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे श्रीनगर येथून पुढे येण्यास त्यांना मज्जाव करण्यात आला.

Protected Content