शिरीष चौधरी यांना रावेरमधून उमेदवारी ; काँग्रेसची पहिली यादी जाहीर

shirish chaudhari

मुंबई (प्रतिनिधी) काँग्रेसने अखेर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात जळगाव जिल्ह्यातील रावेर विधानसभा मतदार संघातून माजी आमदार शिरीष चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

 

आजच्या यादीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह 51 नावांचा समावेश आहे. या उमेदवारांनामध्ये  अक्कलकुवा – के.सी पडवी,शहादा – पदमाकर विजयसिंग वालवी,नवापूर – शिरिष नाईक,रावेर – शिरिष चौधरी,बुलडाणा – हर्षवर्धन सकपाळ,मेहकर- अनंत वानखेडे,रिसोड – अमित जनक,धामनगाव – विरेंद्र जगताप,तिवसा – यशोमती ठाकूर,आर्वी – अमर शरद काळे,देवळी- रंजीत प्रताप कांबळे,सावनेर- सुनील छत्रपाल केदार,नागपूर उत्तर- एससी- डॉ. नितीन राऊत,ब्रह्मपुरी- विजय नामदेवराव वजेट्टीवार,चिमुर- सतीश मनोहर वर्जुराकर,वरोरा- प्रतिभा सुरेश धानोरकर,यवतमाळ- अनिल बाळासाहेब मांग्रुळकर,भोकर- अशोकराव शंकरराव चव्हाण,नांदेड उत्तर- डी.पी. सावंत,नायगाव- वसंतराव बळवंतराव चव्हाण,देगलूर- रावसाहेब जयवंत अनंतपुरकर,काळणूरी- संतोष कौतिका,पाथरी- सुरेश अंबादास वारपुडकर,फुलंब्री- डॉ. कल्याण वैजंथराव काळे,मालेगाव (मध्य)- शैख असिफ शैख राशिद,अंबरनाथ- रोहित चंद्रकात साळवे,मिरा भाईंदर- सय्यद मुझफ्फर हुसेन,भांडूप (पश्चिम)- सुरेश हरिशचंद्र कोपरकर,अंधेरी (पश्चिम)- अशोकभाऊ जाधव,चांदिवली- मोहम्मद आरिफ नसीम खान,चेंबूर- चंद्रकात दामोदर हंदोरे,वांद्रे (पूर्व)- जिशान जियाउद्दीन सिध्दीकी,धारावी- वर्षा एकनाथ गायकवाड,सायन कोळीवाडा- गणेश कुमार यादव,मुंबादेवी- अमिन अमीराली पटेल,कोलाबा- अशोक अर्जुनराव जगताप,महाड-माणिक मोतिराम जगताप,पुरंदर- संजय चंद्रकांत जगताप,भोर- संग्राम अनंतराव तोपते,पुणे (sc) -रमेश अनंतराव बागवे,संगमनेर- विजय बाळासाहेब थोरात,लातुर शहर- अमित विलासराव देशमुख,निलंगा- अशोक शिवाजीराव पाटील निलंगेकर,औसा- बासवराज माधवराव पाटील,तुळजापूर- मधुकरराव देवराम चव्हाण,सोलापूर शहर मध्य- प्रणिती सुशील कुमार शिंदे,सोलापूर दक्षिण- मौलबी बाशुमिया सयीद,कोल्हापूर दक्षिण- ऋतुराज संजय पाटील,कारवीर- पी.एन. पाटील सादोळीकर,पळुस- कडेगाव- डॉ. विश्वजीत पतंगराव कदम यांचा समावेश आहे.

Protected Content