चाळीसगावात शेकडो भाजपा कार्यकर्त्यांचा सपत्नीक गौरव

695951c8 e629 4a8c a100 e5944bfba200

चाळीसगाव (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीच्या वतीने जनसंघ ते भाजप कार्यकर्त्यांचा व त्यांच्या परिवारातील सदस्यांचा कृतज्ञता व सत्कार सोहळा येथे आयोजित करण्यात आला होता. शहरातील पाटीदार मंगल कार्यालयात सोमवारी सायंकाळी ५.०० वाजता या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टीचे उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री अॅड. किशोर काळकर नवनिर्वाचित भाजप जिल्हाध्यक्ष डॉ.संजीव पाटील, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती पोपट भोळे, तालुका अध्यक्ष के.बी. साळुंखे, भाजप प्रदेश सदस्य उध्ववराव माळी महिला आयोगाच्या माजी सदस्य देवयानी ठाकरे, लोकनियुक्त नगराध्यक्ष आशालता चव्हाण, पंचायत समिती सदस्य सभापती स्मितल बोरसे, हेमांगी पूर्णपात्रे, उमंग महिला परिवाराच्या अध्यक्ष संपदा पाटील , पं.स. उपसभापती संजय पाटील, भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, एरंडोल तालुकाअध्यक्ष एस.आर. पाटील, बाजार समितीचे माजी अध्यक्ष मच्छिंद्र राठोड, यांच्यासह कार्यकर्ते मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

सुरुवातीला जनसंघ ते भाजप प्रवासातील ज्येष्ठ श्रेष्ठ नेते यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वयोवृद्ध जनसंघाचे कार्यकर्ते रामभाऊ पवार गुरुजी यांचा व त्यांच्या परिवारातील सदस्य यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व वडाचे झाड देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका सरचिटणीस अॅड.प्रशांत पालवे यांनी केले.

खासदार उन्मेष पाटील यावेळी म्हणाले की, जनसंघ पासून भारतीय जनता पार्टी पर्यंतचा हा प्रवास आहे, या प्रवासात लाखो ज्ञात-अज्ञात कार्यकर्त्यांनी घेतलेल्या
प्रामाणिक प्रयत्नांच्या बळावरच पक्षाचा विस्तार झाला आहे. कधीकाळी बोटावर मोजण्याइतके लोकप्रतिनिधी असलेला भारतीय जनता पक्ष आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपात जगातला क्रमांक एकचा पक्ष बनला आहे.

याप्रसंगी संघटन मंत्री किशोर काळकर यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गेल्या काळातील कामकाजाचा व त्यांनी केलेल्या संघर्षाचा लेखाजोखा मांडला आपण भाजपचे कार्यकर्ते असल्याचा आपल्याला अभिमान आहे एवढी पक्षाने भरभराटी घेतली आहे. असे गौरवोद्गार त्यांनी काढले. यावेळी के.बी. साळुंके, जिल्हाध्यक्ष संजीव पाटील, शिक्षण सभापती पोपट भोळे,ज्येष्ठ नेते अविनाश सूर्यवंशी यांनीही आपल्या भावना मांडल्या.

कार्यक्रमात स्वर्गीय उत्तमराव पाटील, अॅड. शिवाजीराव पालवे, लक्ष्मणराव गवळी ,जगन राठोड, रमेश गवळी, नागो महानूभाव, वाडीलाल राठोड, दयाराम महाजन यांच्या परिवारातील सदस्यांच्या सत्कार करण्यात आला. माजी जिल्हाध्यक्ष शिवाजीराव पालवे यांच्या परिवारातील अॅड. प्रशांत पालवे, रागिणी पालवे, मनोहर आंधळे, उर्मिला आंधळे यांनी कृतज्ञता सत्कार स्वीकारला. याचबरोबर प्रा.ल.वि. पाठक, प्रेमचंद खिवसरा, विठ्ठलराव देवकर, आरती पूर्णपात्रे, अविनाश सूर्यवंशी, लक्ष्मणराव थोरात, रंगनाथ साबळे, यू. डी. माळी, शरद साबळे, आप्पा वाघ, नारायण साबळे, डॉ. रमेश निकम, महादु चौधरी, एकनाथ चौधरी, प्रकाश पोतदार, लालचंद बजाज, जितू भवानी, प्रवीण वाणी, अॅड. संजय नानकर, पराग कुलकर्णी, श्री. जोशी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांच्या परिवाराचा भव्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस अमोल नानकर यांनी केल तर आभार प्रा.सुनील निकम यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी नगरसेवक नितीन पाटील, धनंजय मांडोळे, अनिल नागरे, कपिल पाटील, अक्षय मराठे,किशोर रणधीर अमिता सुराणा महिला आघाडीच्या डॉ.ज्योती पाटील, फयाज शेख, समकीत छाजेड, जितु वाघ यांच्यासह भारतीय जनता पार्टी भाजप युवा मोर्चा व सर्व आघाड्यांच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. यावेळी खासदार उन्मेष पाटील यांचा विधानसभेतील कामकाजाचा आढावा व तालुक्यातील विकास कामाचा लेखाजोखा असलेल्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.

Protected Content