यावल येथे भाजपच्या वतीने दिव्यांगाना कृत्रिम अवयव आणि साहित्य वाटप

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  खासदार रक्षाताई खडसे यांच्या मार्फत दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटप शिबिराचा कार्यक्रम सोमवार२५ डिसेंबर रोजी यावल पंचायत समितीच्या आवारात पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे व विविध मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला.

देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास या संकल्पनेतून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, भारत सरकार यांच्या दिव्यांग सशक्तीकरण विभाग एडिएपी योजने द्वारा भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम,कानपूर (ALIMCO) यांच्या मार्फत यावल येथे दिव्यांग बांधवांसाठी खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नाने कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटप करण्यासाठी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

यावल पंचायत समितीच्या आवारात आयोजीत शिबिरात सर्वप्रथम देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्ताने प्रतिमेस पुष्पाजंली अर्पण काण्यात आली. रक्षाताई खडसे व जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांच्या उपस्थित दिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध योजनाचे मार्गदर्शन करून साहित्याचे वाटप करण्यात आली. मागील काही महिन्यापूर्वी रावेर लोकसभा क्षेत्रातील सर्व तालुक्यांमध्ये रावेर लोकसभेच्या रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नाने मोफत पूर्वतपासणी व नोंदणी शिबीर चे आयोजन करण्यात आले होते.

पूर्वतपासणी व नोंदणी झालेल्या यावल तालुक्यातील ९५ दिव्यांग बांधवांना आज संबंधित कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटप करण्यात आली . यावेळी भारतीय जनता पक्षाचे पुर्व विभाग जिल्हाध्यक्ष अमोल हरीभाऊ जावळे, श्रीमती रक्षाताई खडसे, जिल्हा परिषदचे माजी शिक्षण समिती सभापती रविंद्र पाटील, भाजप तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, भाजपाचे तालुका सरचिटणीस उज्जैनसिंग राजपूत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हर्षल पाटील, डॉकुंदन फेगडे, माजी तालुका अध्यक्ष डॉ नरेन्द्र कोल्हे, भाजप युवा मोर्चाचे यावल तालुका अध्यक्ष सागर कोळी, शहराध्यक्ष डॉ निलेश गडे,ओबीसी विभागाचे हेमराज ( उर्फ बाळु )फेगडे, किशोर कुलकर्णी, तसेच सर्व आघाडी प्रमुख,सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भुषण फेगडे यांनी केले.

 

Protected Content