‘चोसाका’ची निवडणूक होणार : ‘त्या’ उमेदवारांची याचिका खारीज

चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | चोपडा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आता अटळ झाली आहे.

चोपडा सहकारी साखर कारखाना अर्थात चोसाका हा भाडे तत्वावर देण्यात आला असला तरी सहकार खात्याच्या नियमानुसार यात निवडणूक अपरिहार्य आहे. या निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनल तयार करण्यात आले असून माघारीच्या दिवशी काही जणांचे अर्ज हे पुरेशा वेळेअभावी मागे घेणे राहून गेले. यामुळे माघार घेण्यासाठी इच्छुक असणार्‍या दहा उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली होती. आपण निवडणूक लढविण्यास तयार नसल्याचे प्रतिज्ञापत्र त्यांनी सादर केले होते.

या याचिकेवर सोमवारी दुपारी सुनावणी झाली. यात कोर्टाने संबंधीतांची याचिका फेटाळून लावली आहे. यामुळे आता चोसाकासाठी निवडणूक अटळ झाली आहे. यात माघार घेण्यास इच्छुक असणारे दहा आणि अपक्ष प्रकाश रजाळे असे एकूण ११ अतिरिक्त उमेदवार हे सर्वपक्षीय पॅनलसोबत लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content