तुमच्या तोंडातून भिजलेल्या फटाक्यांची पर्वा आम्ही करत नाही- राऊत

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | शिवसेना पक्षप्रमुखांविषयी व्यक्तिगत द्वेष असेलही पण, राज्याच्या मुख्यमंत्र्यांसंदर्भात काय बोलावे, काय नाही याचे भान विरोधकांनी ठेवावे. मुख्यमंत्र्यांनी जे काय मोठे काम केले आहे, त्या विषयी अशाप्रकारे तुमच्या तोंडातून भिजलेल्या फटाक्यांची तर आम्ही पर्वा करत नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खा. तथा प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आज औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाकडून टीका टिप्पणी तसेच राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी संभाजीनगरमध्ये तोफ धडाडणार असे म्हणतात, पण लवंगी वाजली तरी पुरे, अशी ट्वीटद्वारे शिवसेनेवर टीका केली आहे. तर, औरंगाबादमधील भाजपा नेत्यांच्या देखील प्रतिक्रिया आहेत. दरम्यान या सभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना, विरोधकांचं तोंड नसून गटार आहे. मुख्यमंत्र्यांविषयी काय आणि कसे बोलावे , यांचे भान त्यांनी ठेवावे, असे म्हणत विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

शिवसेनेची पहिली शाखा ३७ वर्षांपूर्वी झाली, त्या पहिल्या शाखेच्या वर्धापनदिना निमित्त संभाजीनगर अर्थात औरंगाबाद शिवसेनेची सभा असून बऱ्याच काळानंतर राज्याचे मुख्यमंत्री हे मुंबईच्या बाहेर जाऊन सभा घेत आहेत. त्या सभेला मुख्यमंत्री ठाकरे संबोधित करणार असल्याने लोकांना या सभेचे आकर्षण असून मराठवाड्यातून लाखो शिवसैनिक या सभेला येतील, असेहि राऊत यांनी म्हटले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!