रावेर प्रतिनिधी । रावेर तहसील कार्यालयात जमीनीच्या वादावरुन सिने- स्टाईल हाणामारी करणाऱ्या दोन्ही शेतकऱ्यांना न्यायालयाकडून दंड ठोठविण्यात आला आहे.
रावेर पोलिसांन कडून मिळालेली माहिती अशी की जमिनीचे वादावरून तहसील कार्यालयात युवराज पाटील (रनगावं ) व मधुकर पाटील (गहुखेडा )यांनी रावेर तहसील कार्यालयात दोघांनीही आपसात तहसील कार्यालयात शाब्दीक बाचा-बाची झाली व नंतर हाणामारी केली दरम्यान तहसीलदार यांनी रावेर पो स्टे येथे घटनेची माहिती दिली असता पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी लगेच पो कॉ प्रमोद पाटील व होमगार्ड यांना पाठविले असता पोलीस पोहचलेवर सुद्धा वरील दोन्ही शेतकरी पोलिसां समोर वाद घालतच होते. त्यांना रावेर पोलीस स्टेशन येथे नेऊन पोलिसांनी दोन्हीवर मुंबई पोलीस कायदा 112/117प्रमाणे गुन्हा दाखल करून दोन्ही पक्षकारास न्यायायल आनंत बाजड रावेर यांचेसमक्ष हजर केले असता प्रत्येकी 1200/-रुपये दंड करण्यात आला आहे.