राजेंद्र चौधरींना शिक्षकरत्न व साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित

सावदा ता. रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । रोझोदा येथील राजेंद्र चौधरी यांना नुकतेच कवी ह.भ.प. श्यामसुंदर महाराज सोन्नर आळंदीकर यांच्या हस्ते दादर येथे राज्यस्तरीय शिक्षकरत्न व साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी यांच्या वतीने आयोजित गुणिजन गौरव पुरस्कार प्रदान सोहळा दि.२२ फेब्रुवारी मंगळवार रोजी दादर येथील दादर माटूंगा सांस्कृतिक केंद्र येथे ज्येष्ठ साहित्यिक रमेश आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली रावेर तालुक्यातील रोझोदा येथील राजेंद्र तुळशीराम चौधरी यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न व साहित्यरत्न पुरस्कार कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे कवी,ह.भ.प. श्यामसुंदर सोन्नर आळंदीकर यांच्या हस्ते सन्मानपत्र,सन्मानचिन्ह तसेच गौरव पदक देऊन गौरविण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहूण्या म्हणून इंटरनँशनल टँलेन्ट आयकाँन डाँ.महालक्ष्मी वानखेडकर उपस्थित होत्या. चौधरी हे जळगाव जिल्ह्यातील रोझोदा येथील रहिवासी आहेत. ते मुंबईच्या बोरीवली येथील हरचंद लोखंडे माध्यमिक विद्यालयात शिक्षक आहे.मुंबईतील ध्यास कवितेचा काव्य मंच सचीव तर शिवानी साहित्यिक मंचचे सहसचीव असून ते कवी,पत्रकार आहेत. चौधरी यांचा अमृतवेल हा स्वलिखित कविता संग्रह असून दिवा तुळशीरामाचा दुसरा कविता संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे.

 

Protected Content