कुटुंबासाठी धडपडणाऱ्या २३ वर्षीय तरूणाचे हृदयविकाराच्या झटक्याने दुदैवी निधन

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गरीब परिस्थितीतून बाहेर पडण्याची धडपड, लहान बहीनीच शिक्षण आणि परीवारासाठी नवीन घर घेण्याचे स्वप्न घेऊन बारामती येथे खाजगी कंपनीमध्ये जॉब करणाऱ्या जयेश मराठेंच आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.त्यामुळे संपूर्ण शहरात एकच हळहळ व्यक्त होत आहे.एकुलता एक मुलगा असल्याने बहीनीने स्मशानभुमीत जाऊन मुखाग्निडाग दिला. जयेश मागील पंधरा दिवासांपूर्वीच पुणे येथून हॉस्पिटल मधुन ब्रेन स्टोनच्या झटक्यातुन बरा होऊन नुकताच रावेर स्वगृही परतला होता. परंतु सकाळी अचानक छातीत दुखायला लागल्याने हॉस्पिटल मध्ये नेतांना त्याचे निधन झाले.

जयेश याचे कुटुंबात अत्यंत गरीबीची परीस्थिती असल्याने तसेच नोकरीच्या शोधात पाच वर्षापूर्वी याचे वडील सोपान मराठे त्यांची पत्नी उषाबाई मराठे मुलगी खुशी व मुलगा जयेश याला घेऊन रावेर शहरात आले होते. आर्थिक चनचनीतुन तीन वर्षापूर्वीच वडील सोपान मराठे यांनी आत्महत्या केली होती. त्यामुळे विधवा आई आणि लहान बहीनीला सांभाळण्याची जबाबदारी जयेश यांच्या खांद्यावर आली होती. सर्व जबाबदारी घेऊन जयेश जिवनाचा मार्गक्रम करत होता. कुटुंबाला आर्थिक चनचन मधुन बाहेर काढण्यासाठी जयेश बारामती येथे एका खासगी कंपनी मध्ये जॉब करत होता.

कुटुंबासाठी नवीन घर घेण्याचे त्याचे स्वप्न होते. परंतु पंधरा दिवासापूर्वी त्याला डोक दुखण्याचा त्रास खुप जाणवला लागला त्याच्या कंपनीत काम करणाऱ्या सहका-यांनी त्याला बारामती व तेथून पुणे हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले. त्याच्या सर्व तपासण्या करण्यात आल्यावर त्याला ब्रेन स्टोनसारखी लक्षने जाणवली. त्याची आई, बहीन, मामा हे देखिल पुणे येथे हॉस्पिटल येथे गेले व तेथे ऑपरेशन केले. यात त्याच्या तब्येतीत सुधार देखिल झाला होता.

उपचार पूर्ण झाल्यावर दोन दिवसापूर्वी जयेश हा रावेर येथे त्याच्या आई व लहान बहीनीकडे आला होता. आज सकाळी त्याला छातीत दुखायला लागले त्याचे मामा त्याला हॉस्पिटल मध्ये घेऊन जात असतांना त्याला त्रास अजुन जास्त वाढला आणि शेवटी जयेश याने त्याचे मामा जितु महाजन, योगेश महाजन व किशोर महाजन याला म्हणाला माझी बहीन व आई यांच कस होईल अस म्हणत जगाचा निरोप घेतला. जयेश याच्या निधनाचे वृत्त शहरात वा-या सारखे पसरताच सर्वांकडून एकच हळहळ व्यक्त होत होती. भाचा जयेश मराठे याला वाचवण्यासाठी त्याचे मामा जितु महाजन, किशोर महाजन, योगेश महाजन पुणे येथील हॉस्पिटल मध्ये शर्तीचे प्रयत्न केले. पुण्याला देखिल हॉस्पिटलमध्ये त्याला सौम्य हद्य विकाराचा झटका आला होता. परंतु उपचार वेळेवर मिळाल्याने तो बरा झाला होता. परंतु ब्रेनच्या आजारातुन बरा होऊन नुकताच रावेरला त्याच्या घरी आला होता. परंतु आज सकाळी मामा हॉस्पिटला घेऊन जात असतांना त्याचे निधन झाले. जयेश याची आई मजूरी करून आपले कुटुंब चालवते.

Protected Content