तरूण-तरूणीस टोळक्याची अमानुष मारहाण

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील आसराबारी गावात आपल्या मुलीसह शौचास जाणारी तरूणी ही एका तरूणाशी बोलत असतांना चार-पाच जणांच्या टोळक्याने त्यांना अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून यात तरूण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, अलीकडेच होळी सण उत्साहात साजरा झाला. आदिवासी बांधवांसाठी हे मोठे पर्व असते. यात भोंगर्‍या बाजारात मोठी गर्दी होत असते. या अनुषंगाने दिनांक २५ मार्च सोमवार रोजी आसराबारी ( वड्री ) तालुका यावल येथे आदिवासी बांधवांचा भोंगर्‍या बाजार उत्सव साजरा झाला. याच रात्री रात्री ८ वाजेच्या सुमारास गावात राहणारी व घटस्फोटीत २८ वर्षीय तरूणी ही आपल्या लहान मुली बरोबर शौचालयास गेली असता, गावात राहणार्‍या अभय तडवी या तरूणाशी बोलत उभी होती. या ठिकाणी शेंडया बारेला, शाम बारेला, गुड्या बारेला, राजु (पुर्ण नाव माहित नाही राहणार जानोरी तालुका रावेर ) या टोळक्याने तरूणीवर संशय घेत तिच्यासह तरूणास झाड़ाला बांधुन बेदम मारहाण केली. या अमानुष मारहाणीचा व्हिडीओ काढण्यात आला असून तो सोशल मीडियात व्हायरल झाल्यामुळे एकच खबळबळ उडाली आहे.

दरम्यान, या घटनेत जखमी तरूणास उपचारास जळगाव येथे एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले असुन, सदरच्या फिर्यादी तरुणीस एका गटाकडून पोलिसात तक्रार दिल्यास तिला जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात येत आहे. यामुळे ती घाबरून गेली होती. अखेर घटनेच्या तिन दिवसानंतर तरूणीने यावल पोलीस ठाण्यात हजर मारहाण करणार्‍या पाच जणां विरूध्द तिने फिर्यादी दिली असुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Protected Content