भुसावळात बेकायदेशीर कत्तलीसाठी गुरांची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक

भुसावळ प्रतिनिधी । विनापरवाना व बेकायदेशीर कत्तलीसाठी गुरांना कोंबून घेवून जाणाऱ्या दोघांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातील १२ गुरांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलीसांकडून‍ मिळालेली माहिती अशी की, भुसावळातील गुरांच्या कत्तलखान्यात विनापरवाना व बेकायदेशीरित्या दोन व्यक्ती आणत असल्याची माहिती भुसावळ बाजारपेठ पोलीसांना मिळाली त्यानुसार भुसावळ पोलीसांनी शहरातील गौसिय नगर भागात सत्तार पहेलवान यांच्या गल्लीत कब्रस्तानाच्या बाजुला संशयित आरोपी नुरोद्दिन शेख सलाउद्दिन (वय-३७) रा. गौसिय नगर यांच्या ताब्यातील सात गुरे रात्री १२ वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले तर दुसऱ्या घटनेत नफिस शेख अनवर (वय-२८) रा. फोफनागर ता.जि.बऱ्हाणपूर (म.प्र.) ह.मु.हिंगोणा ता.यावल हा महिंद्रा पिकअप व्हॅन (एमएच ४६ ई ४७२७) हा मध्यरात्री २.४५ वाजेच्या सुमारास पाच गुरांना निर्दयीपणे कोंबून नेत असतांना आढळून आले. दोघांविरोधात भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई
भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी पथक तयार करून सपोनि अनिल मोरे, पोलीस नाईक रविंद्र बिऱ्हाडे, समाधान पाटील, रमण सुरळकर, संदिप परदेशी, पोकॉ कृष्णा देशमुख, विकास सातदिवे, ईश्वर भालेरा, प्रशांत परेदशी, सचिन पोळ यांनी कारवाई केली. पुढील तपास पोहेकॉ जयेंन्द्र पगारे करीत आहे.

Protected Content