‘एक तास आरोग्यासाठी’ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

एरंडोल प्रतिनिधी । आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त येथील मैत्री सेवा फाउंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या “एक तास आरोग्यासाठी” या उपक्रमास शहरवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. 

मैत्री सेवा फाउंडेशन तर्फे आज दि.२१ जुन रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने ‘एक तास आरोग्यासाठी’ हा उपक्रम राबवण्यात आला.या उपक्रमात अनेक नागरिकांनी व विध्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. या उपक्रमास कु. धनश्री पाटील (नॅशनल योगा चॅम्पियन, पुणे) यांनी सर्वांना ऑनलाईन योगाआसनांचे प्रशिक्षण दिले.

यात ” कै.य.ब.पाटील शिक्षण प्रसारक मंडळ तळई संचलित मुलांचे आणि मुलींचे बालगृह , खडके बु ” या बालगृहाच्या सुमारे ४० विध्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला त्याच बरोबर  श्री.गोरखनाथ महाजन सर संचलित ” माऊली क्लासेस ” येथील सुद्धा ६६ विध्यार्थ्यांनी,मैत्री सेवा फाउंडेशन च्या ऑनलाईन प्रसार माध्यमांवर बघून सुमारे २३६ नागरिकांनी त्यांच्या कुटुंबा सोबतच योग केला.सुमारे ३४२ नागरिकांनी या एक तास आरोग्यासाठी या उपक्रमात आपला सहभाग नोंदवून योग केला.

Protected Content