देशव्यापी कडक निर्बंध ३० जूनपर्यंत !

नवी दिल्ली वृत्तसंस्था । कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नसल्यामुळे केंद्र सरकारने देशभरातील कडक निर्बंध ३० जूनपर्यंत वाढविले आहेत. केंद्रीय गृह सचिवांनी याबाबतची माहिती दिली आहे.

सध्या देशात कोरोना रूग्णांची संख्या कमी झाली असली तरी मृत्यूची वाढती संख्या चिंताजनक मानली जात आहे. यामुळे सध्या लागू करण्यात आलेले कडक निर्बंध हे ३० जूनपर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी दिली आहे.

या संदर्भात अजय भल्ला म्हणाले की, करोनाला नियंत्रणात आणण्यासाठी देशात लावण्यात आलेले कठोर निर्बंध ३० जूनपर्यंत कायम राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी निर्बंध गरजेचं असल्याचं गृहमंत्रालयाने सांगितलं आहे. निर्बंधांची कठोर अंमलबजावणी केली असल्याने अनेक राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नवे तसंच अॅक्टिव्ह रुग्णसंख्या कमी झाली आहे.

दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परिस्थितीचा आढावा घेऊन राज्यांनी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार निर्बंध लागू करावेत असं सांगितलं आहे.

Protected Content