भरधाव ट्रकने एकाला चिरडले

चाळीसगाव प्रतिनिधी । पायदळ जात असलेल्या एका तरूणाला भरधाव ट्रकने उडविल्याने त्याचा जागी मृत्यू झाल्याची घटना औरंगाबाद बायपास चौफुली जवळ घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अरूण पंडित सुळ (वय-३५ रा. कुलस्वामिनी, हिरापूर रोड, खडकी बु.) हे कामानिमित्त एमआयडीसीकडे पायदळ जात असताना मागून भरधाव ट्रकने (क्र. एच.आर. ७४ अ- ८१५६) अरूण पंडित सुळ यांना धडक दिली. यात त्यांचा दुदैवी मृत्यू झाला.

ही घटना २६ रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास धुळे-औरंगाबाद बायपासवरील खडकी चौफुलीजवळ घडली. या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान ट्रक चालकाला त्याचे नाव विचारले असता अब्दुल हमीद रहमत (वय-४८ रा. घासेडा, राज्य- हरियाणा) असे सांगण्यात आले. अंत्यविधी आटोपल्यानंतर उशिराने प्रविण लक्ष्मण सुळ यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस स्थानकात भादंवि कलम- ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८ व १८४ अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहेत.

Protected Content