चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पावसामुळे शहरातील रस्त्यांची तात्पुरती का होईना तातडीने दुरुस्ती आवश्यक होती. राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर शहरासाठी भरीव निधी आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले असून लवकरच ५ कोटींच्या कामांना मंजुरी मिळणार असल्याचे सांगत आमदार मंगेश चव्हाण यांनी स्वखर्चाने दयानंद ते खरजई नाका रस्त्यासह शहरातील प्रमुख रस्त्यांची मुरूम व खडी टाकून दुरुस्ती कामाला सुरुवात केली आहे.
प्रभाग क्रमांक 3 सह शहरवासीयांना त्रासदायक ठरत असणाऱ्या हॉटेल दयानंद ते खरजई नाका रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी. अशी मागणी मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून होत होती. तसेच चाळीसगाव शहरात भुयारी गटार योजनेच्या कामामुळे काळी माती वर आल्याने अनेक प्रमुख रस्त्यांची दुरावस्था झाली होती.
नुकताच राज्यात सत्ता बदल झाल्याने शहरासाठी भरीव निधी आणण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रयत्न सुरु केले असून पहिल्या टप्प्यात लवकरच ५ कोटींच्या कामांना मंजुरी मिळणार आहे. मात्र सातत्याने चाळीसगाव तालुक्यात सुरु असलेल्या पावसामुळे रस्त्यांची तात्पुरती का होईना तातडीने दुरुस्ती आवश्यक होती. यासाठी आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी पुढाकार घेतला असून स्वखर्चाने दयानंद ते खरजई नाका रस्त्यासह शहरातील प्रमुख रस्त्यांची मुरूम व खडी टाकून दुरुस्ती कामाला सुरुवात केली आहे.
आमदार चव्हाण यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांसह रस्त्याची पाहणी करत कामाचा स्थानिक नागरिकांच्या हस्ते नारळ फोडून शुभारंभ केला. लवकरच चाळीसगाव शहरातील रस्ते, पूल व उद्यानांच्या विकासकामांसाठी २० कोटी रुपये निधी मंजूर होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह जेष्ठ नगरसेवक राजेंद्र अण्णा चौधरी, भाजपा शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, नगरपालिका गटनेते संजय रतनसिंग पाटील, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील, नगरसेवक नितीन पाटील, चंद्रकांत तायडे, माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी, भास्कर पाटील, सदानंद चौधरी, रणजीत पाटील, हर्षल चौधरी, जितेंद्र वाघ, योगेश खंडेलवाल, कैलास नाना पाटील, अभय वाघ, देवा गांगुर्डे, मनोज गोसावी, बंडू पगार, अग्गा सैय्यद, अकलाक खाटिक, धीरज पवार, मयूर घोरपडे, विकी देशमुख, विपुल पाटील यांच्यासह प्रभाग क्रमांक ३ मधील नागरिकांची उपस्थिती होती.