कॉंग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

कोल्हापूर प्रतिनिधी | कॉंग्रेसनचे उत्तर कोल्हापूरचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे आज पहाटे उपचार सुरू असतांना निधन झाले.

कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव (अण्णा ) यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हैदराबाद मधील रुग्णालयात उपचार सुरु होते. दुपारी एक पर्यंत त्यांचे पार्थिव कोल्हापुरात आणण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. त्यांचा कोल्हापूर शहरातील अनेक तालीम मंडळाशी फुटबॉललच्या माध्यमातून थेट संपर्क होता. त्याबरोबरच राजकीय व सामाजिक कार्यातून त्यांनी मोठा जनसंपर्क निर्माण केला होता.

२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जाधव यांनी कॉंग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवून विजय प्राप्त केला होता. पहिल्यांदाच निवडणूक लढवून त्यांनी हे यश मिळवले होते. साधी राहणी आणि लोकांमध्ये मिसळण्याच्या स्वभावामुळे ते लोकप्रिय होते. त्यांच्या निधनाने मतदारसंघातील नागरिकांवर शोककळा पसरली आहे.

Protected Content