यावल येथे ज्येष्ठ नागरीकांसाठी एकदिवसीय आरोग्याबाबत कार्यशाळा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग व तहसीलदार यांच्यावतीने तहसील कार्यालयात यावल तालुका व जिल्हा समन्वयक, ज्येष्ठ नागरीकांसाठी एकदिवसीय आरोग्य विषयक कार्यशाळा घेण्यात आली.

 

या कार्यशाळेत विद्यापीठाचे मनिष जोशी, फेस्कॉमचे माजी अध्यक्ष प्रा. एस.बी. महाजन, कार्यकारी संचालक डॉ. एस.आर. पाटील, सचिव बी.एन.पाटील, बाळकृष्ण वाणी यांच्या उपस्थितीत आद्य संस्थापक राधाकृष्ण भट यांचा फोटो पूजन करण्यात आला.

 

कार्यक्रमाच्या सुरूवातील प्रा. एस बी महाजन यांनी आरोग्य शिबीराचा उद्देश आणि आजची जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांची परस्थितीचा आढावा विषद केला. गाव तेथे ज्येष्ठ नागरिक संघ असावा ही संकल्पना केली. शिवाय प्रत्येक ज्येष्ठ नागरिक संघाने आपले संघातील हयात असलेले सभासद यांची यादी इंग्रजीतून व नमुन्यातून अविनाश लकारे पुणे यांचेकडे पाठवावी. हे सर्व संघ महाराष्ट्रातील डीजीटल करून प्रत्येक सभासदांची माहिती नुसार चौकशी करून त्यांना शासनाच्या सेवा पोहचत आहे की नाही याचा आढावा घेणार आहे.

 

रावेर येथील ओंकारेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ. एस.आर. पाटील अध्यक्ष यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की,  ज्येष्ठांनी वयाच्या ५० व्या वर्षापासून मानवी शरीरातील अवयवांची शिथीलता येते त्यासाठी अवयवांची काळजी घ्यावी. अवयवांकडे दुर्लक्ष करू नका, नियमित चालावे, बोलावे, ऐकावे, व्यायाम, प्राणाम व झोप शारिरीक हालची होणं आवश्यक आहे. घरातील प्रत्येक बाबींशी संपर्क असावा एकदम हालचाल सतत असावी. मुंबई येथील नितीन बापट यांनी पन्नास वर्षानंतर सुंदर आयुष्य कसे कसे जगावे यांचे चित्रफितीव्दारे माहिती समजून सांगितील. संसारातून मुक्त, जबाबदारी फारच कमी, कपड्यांपेक्षा दृष्टीकोन बदला व स्वतःला वयोवृद्ध समजूच नका. आपण आपला कमावलेला पैसा आपल्यासाठी उपयोगात आणा, आनंद घ्या. मुलांना स्थीर केल्यावर त्यांच्या जीवनापेक्षा आपले जीवन कसे आनंदीत ठेवता येईल याकडे जास्त लक्ष द्या. फेसकॉम चे माजी अध्यक्ष डी. टी. चौधरी यांनी त्यांच्या भाषणात जे. ता. संघ संस्था व त्यांचा विकास परिस्थिती विषद केली. गाव तेथे संघ स्थापन करावा. जुनेसंघ सुरू ठेवा ज्येष्ठांनी ऐकमेकांना आतापर्यंत संघातून मदत करावी. त्याच प्रमाणे १५ जून ज्येष्ठ नागरिक अवहेलना दिन साजरा करा व ज्येष्ठांना मदतीला धावून जावे हा विचार दिला.

 

राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त डॉ. व्ही. आर. पाटील यांनी जेष्ठांना मदत, निर्वासीत मुलींचे संगोपन, आदिवासींचे संगोपन, कोरोनात आई वडील गेले त्यांचे अपत्यांचे संगोपन करतात. त्यांच्या सौ. पाटील यांना मदत करतात. त्यांनी अहिराणी भाषेतून मानवी जीवनातील प्रसंग, देवीची गाणी विवाह प्रसंगीचे गीत संग्रह तयार केला.

श्री. अशोक पवार अमळनेर मास्टर ट्रेनर यशदा पुणे २००५ माहितीचा अधिकार २०१५ महाराष्ट्र लोक सेवा हक्क, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन, युवा क्रांती मार्गदर्शन करीत असतात. ज्येष्ठांसाठी २००७ कार्यक्रमाचे मार्गदर्शन त्यांनी केले. ज्येष्ठांची आज अवहेलना पाहता त्यांना जीवनात, सुखी कसे रहाता येईल अशी माहिती २००७ च्या कायद्याव्दारे त्यांनी समजून सांगितली. प्राचार्य बी.एन.पाटील सचिव फेस्कॉम प्रादेशिक वभाग धुळे जे. ना. संघटना बळकट झालीच पाहीजे. त्याशिवाय आपल्या मागण्यांचा शासन विचारच करणार नाही असे प्रखर विचार मांडले.

 

श्रीमती एम.बी.वाणी व बाळकृष्ण वाणी यांचा डी. टी. चौधरी व एस.बी.महाजन रावेर समन्वयक जळगांव जिल्हा यांनी सत्कार केला. शितल पाटील जळगांव या ज्येष्ठ नागरिक व त्यांचे जीवनावर सारासार अभ्यास करून त्यांच्या समस्यांचा विचार करून पी.एचडी. करत आहे. त्यांना ज्येष्ठांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

 

श्रीमती मिनाक्षी कोळी या सुद्धा ज्येष्ठांचे जीवनात आपण कसे सहकार्य करू यासाठी हेल्पनाईन घेवून आल्या होत्या त्यांनी कोणाची व कशा प्रकारे मदत होवू शकते यांचे सविस्तर मार्गदर्शन केले.

 

कार्यक्रमाचे अध्यक्ष शिरसोली येथील जगतराव पाटील यांनी सर्व ज्येष्ठांनी एकत्र राहून संघ निर्मिती करून विद्यापीठाचा मार्गदर्शन घेवून लाभ घ्यावा व गाव तेथे संघ असावा ही घोषणा त्यांनी केली. बी.एन. पाटील प्राचा यांनी प्रा. विमल वाणी यांनी पसादान म्हणून कार्यक्रमाची सांगता केली.

 

या कार्यक्रमासाठी यावल तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद आणि रावेर तालुक्यातील ऐनपूर, रावेर,वाघोदा, तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील जोशी, चोपडा तालुक्यातील करोडपती, साकळीचे भास्कर रामजी महाजन, जळगांव जिल्ह्यातून व नंदूरबार धुळे जिल्ह्यातून या आरोग्य शिबिराला बहुसंख्य ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. सुत्रसंचालन रावेर येथील आर.बी.महाजनसर यांनी केले.

 

Protected Content