पाचोरा येथील माहेरवाशिणीचा शारीरिक व मानसिक छळ

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | पाचोरा येथील माहेर असलेल्या २२ वर्षीय विवाहितेचा माहेरहुन पैसे आणावे, या मागणीसाठी वारंवार शारिरीक व मानसिक छळ सुरू होता. सततच्या त्रासाला कंटाळून अखेर विवाहितेने पती, सासु व नणंद या तिघांविरुद्ध पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाचोरा शहरातील महादेव गल्ली, कृष्णापुरी येथील माहेर असलेल्या शुभांगी हिचा विवाह सुरत येथील सुनिल बाळकृष्ण मोरे याचेशी दि. १८ फेब्रुवारी २०१८ ला कृष्णापुरी येथे मोठ्या थाटात झाला होता. दरम्यान लग्नानंतर माहेरहुन पैसे आणावे, म्हणुन शुभांगी सुनिल मोरे हिचा सासु शोभाबाई बाळकृष्ण मोरे, नणंद प्रतिभा गणेश पाटील यांनी शारिरीक व मानसिक छळ सुरू केला होता.

सततच्या त्रासाला कंटाळून अखेर विवाहिता शुभांगी मोरे हिने सुनिल मोरे (पती), शोभाबाई मोरे (सासु) व नणंद प्रतिभा पाटील सर्व रा. सिलीकाॅन सोसायटी, हाळधरु रोड, स्वरुत्व हाॅटेलमागे, सुरत जि. सुरत यांचे विरुध्द पाचोरा पोलिसात गुन्हा नोंदविला असुन या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल कैलास राजधर पाटील हे करीत आहे.

Protected Content