अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमळनेर विधानसभा मतदारसंघातून मंत्री अनिल भाईदास पाटील यांना पहिल्याचा फेरीत भक्कम बहुमत मिळाल्याचे दिसून येत आहे.
अमळनेर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीने अजित पवार गटाचे मंत्री अनिल भाईदास पाटील यांना आधीच उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी विलंब झाला. पहिल्यांदा तर ही जागा नेमकी कुणाला सुटणार ? याबाबत संभ्रमाचे वातावरण होते. शेवटच्या टप्प्यात ही जागा काँग्रेसला सुटली. या पक्षाने ज्येष्ठ नेते डॉ. अनिल शिंदे यांना उमेदवारी दिली. तर माजी आमदार शिरीष हिरालाल चौधरी यांनी अपक्ष उमेदवारी केली. यामुळे येथे तिरंगी लढत झाली. यात प्रचाराच्या दरम्यान अनिल पाटील आणि शिरीष चौधरी यांच्याच जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. मतदारसंघातून 65.61 टक्के मतदान झाले होते. यानंतर सर्वांना निकालाची उत्सुकता लागली होती.
दरम्यान, आज सकाळी मतमोजणी सुरू झाली. यात अनिल भाईदास पाटील यांना ४ हजार २०० मतांची आघाडी मिळालीआहे. अपक्ष उमेदवार शिरीष हिरालाल चौधरी आणि काँग्रेसचे डॉ. अनिल शिंदे हे पिछाडीवर आहे,