मंत्री गिरीश महाजन यांना पहिल्या फेरीत दणदणीत आघाडी !

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जामनेर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी मतमोजणीच्या पहिल्या फेरीत आघाडी मिळवली असून येत्या काही तासांमध्ये मतमोजणीचा संपूर्ण निकाल समोर येणार आहे. गिरीश महाजन यांना पहिल्या फेरीत ५ हजार ७ मते मिळाली तर दिलीप खोडपे यांना ३ हजार ६७२ मते मिळाली आहे.

जामनेर विधानसभा मतदारसंघातून गिरीशभाऊ महाजन यांनी लागोपाठ सहाव्यांना विजय मिळविला असून ते यंदा सातव्यांदा भाजपच्या तिकिटावर महायुतीचे उमेदवार म्हणून रिंगणात होते. त्यांचेच कधी काळचे निकटचे सहकारी तथा जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिलीप खोडपे यांना राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने गळाला लावल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्यांनाच पक्षाने विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली. खोडपे यांनी प्रचाराच्या दरम्यान महाजन यांच्या समोर मोठे आव्हान उभे केल्याचे दिसून आले.

गिरीशभाऊ स्वत: प्रचारात उतरले नसले तरी त्यांच्या प्रचाराची धुरा ही साधनाताई महाजन यांनी समर्थपणे सांभाळली. दिलीप खोडपे यांनी मात्र गावोगावी प्रचार फेऱ्या काढून मतदारांशी संवाद साधला. त्यांच्या साठी शरद पवार यांच्यासह एकनाथराव खडसे यांनी सभा घेतल्या. तर खासदार अमोल कोल्हे यांनी रोड शो करून त्यांच्यासाठी मते मागितली. या निवडणुकीत दिलीप खोडपे यांच्या बाजूने मराठा समाजाच्या मतांचे ध्रुवीकरण झाल्याची चर्चा सुरू होती. निवडणुकीत ७०.५५ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला होता. यात नेमका कुणाचा विजय होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

या पार्श्वभूमिवर, आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी सुरू करण्यात आली. यात प्रारंभी टपालाने करण्यात आलेल्या मतांची मोजणी करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने शासकीय अधिकारी व कर्मचारी, दिव्यांग, वयोवृध्द आदींनी केलेल्या मतदानाचा समावेश होता. या टपाली मतदानाच्या पहिल्या फेरीत गिरीश महाजन यांना ५ हजार ७ मते तर दिलीप खोडपे यांना ३ हजार ६७२ इतकी मते मिळाली. यात गिरीश महाजन यांना लीड मिळाल्याचे अधोरेखीत झाले आहे. तर, आता मतमोजणी यंत्रांची मतमोजणी होणार आहे. याचे अपडेट आम्ही आपल्याला देणार आहोत.

Protected Content