चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | चोपडा विधानसभा मतदारसंघातून शिवसेना-उबाठाचे उमेदवार प्रभाकरआप्पा सोनवणे यांना पहिल्या फेरीत आघाडी मिळाली आहे.
एस. टी. प्रवर्गासाठी राखीव असलेल्या चोपडा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या वतीने माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांना महायुतीचे उमेदवार म्हणून तिकिट मिळाले. विरोधकांनी मात्र तिकिट वाटपात विलंब केला. यात हा मतदारसंघ शरद पवार गटाकडे असतांना देखील शिवसेना-उबाठाने प्रतिष्ठेचा मुद्दा करत हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणला. येथून या पक्षाने भाजपचे नेते तर जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रभाकरआप्पा सोनवणे यांना उमेदवारी दिली. प्रचार सुरू असतांनाच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे काही दिवस ते प्रचार करू शकले नाही.
मात्र माजी विधानसभा सभापती अरूणभाई गुजराथी व माजी आमदार कैलास गोरख पाटील तसेच अन्य स्थानिक नेत्यांनी सहकार्य करत त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली. या मतदारसंघातून 66.58 टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला होता. यानंतर येथून नेमकी कोण बाजी मारणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमिवर आज सकाळी मतमोजणीस प्रारंभ झाला. यात प्रभाकरआप्पा सोनवणे यांना 4618 तर प्रा. चंद्रकांत सोनवणे यांना 4130 मते मिळाली. यामुळे प्रभाकरआप्पा यांना आघाडी मिळाल्याचे दिसून येत आहे.