चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून आमदार मंगेश चव्हाण यांना दुसऱ्या फेरीत आघाडी मिळाली आहे. त्यांना दुसऱ्या फेरीत मंगेशदादा चव्हाण यांना ६६०३ मते मिळून ते आघाडीवर आहे.
चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात यंदा विद्यमान आमदार मंगेश चव्हाण यांच्या समोर माजी खासदार तथा माजी आमदार उन्मेष पाटील यांनी आव्हान उभे केले होते. खरं तर हा मतदारसंघ शरद पवार गटाचा असतांना देखील उन्मेष पाटील यांच्यासाठी शिवसेना-उबाठा पक्षाला मतदारसंघ सोडण्यात आला. यात निवडणुकीत मोठी चुरस दिसून आली. महायुतीसाठी अमित शाहा यांची तर महाविकास आघाडीसाठी उध्दव ठाकरे यांची सभा झाली. निवडणुकीच्या काळात दोन्ही उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी एकमेकांवर जोरदार चिखलफेक केली. यामुळे निवडणुकीत मोठी चुरस दिसून आली.
दरम्यान, आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी सुरू करण्यात आली. यात प्रारंभी टपालाने करण्यात आलेल्या मतांची मोजणी करण्यात आली. यानंतर मतमोजणी सुरू झाली. याच्या दुसऱ्या फेरीत आमदार मंगेश चव्हाण यांना तर उन्मेष पाटील हे पिछाडीर आहे. यामुळे दुसऱ्या फेरीत आमदार मंगेश चव्हाण यांना लीड मिळाल्याचे अधोरेखीत झाले आहे. यात फेरीनिहाय मते मोजण्यात येणार आहेत. यात काही तासांमध्येच निकालाचा कल कळून येणार आहे. आम्ही आपल्याला यातील प्रत्येक अपडेट देणार आहोत.