भुसावळसह सहा तालुक्यांवर जलसंकट; हतनूरमधील जलसाठा संपुष्टात (व्हिडीओ)

dharan

भुसावळ संतोष शेलोडे | तालुक्यातील हतनूर धरणातील जलसाठा संपुष्टात आल्याने शहरासह इतर तालुक्यांना पाण्यासाठी हा धोक्याचा संकेत मानला जातोय. मृतसाठ्यातून फक्त एक आवर्तन सुटेल एवढेच पाणी आताच्याघडीला शिल्लक आहे. धरणातील संपूर्ण जलसाठा संपला असून धरण कोरडे पडले असल्यामुळे इतर ६ तालुक्यांवरही जलसंकट येऊन ठेपले आहे.

 

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव जिल्हातील हतनूर धरण हे पूर्णपणे कोरडे पडले आहे. या धरणात जून महिन्यात इतकी विदारक स्थिती यापूर्वी कधीच दिसली नाही. महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस सुरु  आहे. परंतू अद्याप हतनूर धरणात पाण्याची आवक झालेली नाही आहे. सन १९९२ मध्ये धरणातील मृतजलसाठ्यात केवळ ५० दलघमी जलसाठा शिल्लक होता. आता तर १९९२ पेक्षाही बिकट स्थिती निर्माण झाली आहे. हतनूरच्या पाणलोटक्षेत्रात आतापर्यंत अवघा सरासरी १३० मिलीमिटर पाऊस झाला. मात्र उन्हाळा कडक असल्याने जमिनीत पाणी मुरले. मध्यप्रदेशात व सातपुड्याच्या पर्वतात झालेल्या पावसाचा फायदा या धरणाला होतो. मात्र त्या भागातही अद्याप पाऊस झालेला नाही.  हतनूरच्या मृतसाठ्यातून सोडलेले आवर्तन भुसावळ तसेच रेल्वेला १५ ते २० जूलैपर्यंत पुरेल एवढेच आहे. दीपनगर औष्णिक वीज केंद्रातील बंधाऱ्यातही जूलै अखेरपर्यंतचा जलसाठा आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक न झाल्यास हतनूरवर अवलंबून असलेल्या शहरांना सहा रेल्वे, औष्णिक वीज केंद्र यांना तिव्र टंचाई उद्भवू शकते.

Protected Content