Home क्राईम पुस्तकांसाठी नववीतील विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न

पुस्तकांसाठी नववीतील विद्यार्थिनीचा आत्महत्येचा प्रयत्न

0
101

suicide pro.......
 

जळगाव (प्रतिनिधी) शाळेचे पुस्तके वेळेवर न मिळाल्याने एका नववीत शिकणाऱ्या मुलीने रागाच्या भरात घरात कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार मुक्ताईनगर येथे आज सकाळी घडलाय. जिल्हा सामान्य रुग्णालय संबंधित मुलीला उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुक्ताईनगर शहरातील संभाजीनगरमधील एक मुलगी नववीत शिकते. तिने वडिलांकडे पुस्तके मागितली होती. परंतू पुस्तकं वेळेत न मिळाल्याने तिने संतापाच्या भरात घरात कुणीही नसताना आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास ओढणीच्या सहाय्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार तिच्या आजोबांच्या लक्षात येताच त्यांनी तिला तातडीने खाली उतरवले. परिस्थिती गंभीर असल्यामुळे विद्यार्थिनीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत पोलिसात कुठलीही नोंद नसल्याचे कळते.


Protected Content

Play sound