२५ हजारांची लाच घेतांना ग्रामसेवकास अटक

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील शेवगे येथे कार्यरत असणारे ग्रामसेवक शाम पांडुरंग पाटील याला २५ हजार रूपयांची लाच घेतांना आज सापळा लाऊन लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने गजाआड केले.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, तक्रारदार हे ग्रामपंचायत शेवगे, ता.पारोळा येथील सरपंच असून सन २०१८ मध्ये शेडगे प्र.ज. गावातील एकूण ३८ लाभाथी पाना महाराष्ट्र शासनाची स्वच्छ भारत मिशन योजने अंतर्गत मंजूर झालेल्या शौचालय बांधकामाचे काम घेतलेले आहे. यातील लाभार्थ्यांना शौचालय बांधकामाचे प्रत्येकी १२, ०००/- रु. मिळालेले आहेत. तसेच सन २०१९ मध्ये तक्रारदार शेवगे प्र.ब. ग्रामपंचायती मार्फत शेवगे प्र.ज. तांडा गावातील गाव विहीरीचे गाळ काढण्याचे काम घेतलेले असुन सदर कामाचे ५२,०००/- रु. तक्रारदार यांना मिळालेले होते.

दरम्यान, गावातील ग्रामसेवक शाम पाटील यांनी दि. २५/०६/२०१९ रोजी पंचायत समिती कायालय, पारोळा येथे तक्रारदार यांना बोलवून सांगितले की, शौचालय बांधकामाचे व गाव विहिरीच्या गाळ काढण्याच्या कामाचे बिल काढुन दिलेले आहे. त्याचे मोबदल्यात तु मला ३०,०००/- रु. ३, पैसे न दिल्यास मी मापुढील तुझे कुठलेही बिल मंजूर होऊ देणार नाही असे ते म्हणाले. यामुळे तक्रारदाराने धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली. या अनुषगांने पडताळणी केली असता तक्रारदार
यांचेकडे लोकसेवक शाम पाटील यांनी तडजोडीअंती २५,०००/ रुपये लाचेची मागणी आली. त्यानुसार आज दि. २७ रोजी पंच साक्षीदार यांच्यासमोर संबंधीत ग्रामसेवक शाम पाटील याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, नाशिक परित्र,
नाशिक, अपर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक सुनिल कुराडे,
पोनि/महेश भोरटेकर व त्यांच्या पथकातील पोडेको/जमंत साळवे, पोना/संतोष हिरे संदीप सण सुधीर सोनवणे, कृष्णकांत वाडीले, शरद काटके, कैलास जोहरे प्रकाश सोनार पोको/प्रशांत चौधरी, भुषण बलाणेकर संदीप कदम व सुधीर मोरे अशांनी सदरची कारवाई केलेली आहे.

Protected Content