अरे बापरे : भुसावळात भरधाव ट्रक घरात शिरला

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील गजानन महाराज मंदिराजवळ भरधाव वेगाने धावणारा ट्रक घरात शिरल्याने एकाचा मृत्यू झाला असून तिघे जण जखमी झाले आहेत.

शहरातील यावल रोडवरून नेहमीच अवजड वाहनांची वाहतूक होत असते. या रस्त्यावर अनेकदा लहानमोठे अपघात होत असतात. दरम्यान, आज येथून भरधाव वेगाने धावणार्‍या एमएच४६ एएफ ५५५४ क्रमांकाच्या मिनी ट्रकने आधी दोन जणांना कट मारले. यानंतर गजानन महाराज मंदिराच्या जवळ असणार्‍या घराला धडक दिली. या घरात दोन जण होते. त्यातील एकाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. तर, रस्त्यावर कट मारल्याने देखील दोन जण जखमी झाले आहेत. शहरात भर दिवसा सुमारे अकराच्या सुमारास घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.

यावल नाक्यासमाेरील डॉ. आंबेडकर नगरातील रहिवासी सम्राट दादाराव इंगळे (वय २१) घरात आंघोळ करत असताना सकाळी १० वाजता भरधाव ट्रकने (क्रमांक एमएच.४६-एएफ. ५५५४) त्यांच्या घराला धडक दिली. त्यामुळे अंगावर भिंत पडून सम्राट आणि घरात झोपलेला त्याचा भाऊ नीलेश इंगळे हे जखमी झाले. यानंतर दवाखान्यात नेल्यावर सम्राटला मृत घोषित करताच कुटुंबीयांनी आक्रोश केला.

संतप्त जमावाने ट्रकचालक कलीम सलीम कुरेशी (रा. सावदा) याला वाहनातून बाहेर काढून चोप दिला. नंतर पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. याप्रकरणी नीलेश इंगळे याच्या फिर्यादीवरून भुसावळ शहर पोलिसांत ट्रक चालक कलीम सलीम कुरेशी (रा.सावदा) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला. तपास एपीआय संदीप दुणगहू करत अाहे.

या दुर्घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्थानकाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केला आहे. दरम्यान, ट्रकचा चालक हा मद्यधुंद होता की काय ? यबाबातच चौकशी करण्यात येत आहे. तर रस्त्याला लागून असणार्‍या झोपडीवजा घरावर हा ट्रक आदळल्याने या घराचे मोठे नुकसान देखील झाले आहे. यावल रोडवरील असुरक्षित वाहतुकीचा मुद्दा यातून पुन्हा एकदा अधोरेखीत झाला आहे.

Protected Content