महावितरणचा हलगर्जीपणा; विजेच्या धक्क्याने म्हैस दगावली

electricshock

जळगाव प्रतिनिधी । मेहरुण परिसरातील शिवाजी उद्यानातून तलावाकडे पाणी पिण्यासाठी जात असलेल्या म्हशीचा विद्युत खंब्याला स्पर्श झाल्याने म्हैस दगाविल्याची घटना दुपारी १२.४५ वाजेच्या सुमारास घडली.

यामुळे तांबापूर गवळी वाड्यातील रहिवाशी आबा नाना हटकर यांचे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले. महावितरणच्या कर्मचार्‍यांनी तात्काळ याठिकाणी धाव घेवून विद्युत पुरवठा खंडीत केला. आबा हटकर हे शिवाजी उद्यानमार्ग म्हशी घेवून मेहरुण तलावाकडे जात असतांना अचानक एका विद्युत पोलला म्हशीचा स्पर्श झाल्याने क्षणातच म्हैस दगाविली. सकाळपासूनच शिवाजी उद्यानातील बर्‍याचशा विद्युत पोलमध्ये प्रवाह उतरला असल्याचे परिसरातील विक्रेत्यांनी सांगितले. दुपारी भेळ विक्रेत्याने याबाबत महावितरणच्या कर्मचार्‍यांकडे तक्रार देखील केली होती. कर्मचारी येण्यापूर्वीच विद्युत पोलला स्पर्श झाल्याने म्हैस दगाविल्याची घटना घडली. दरम्यान महावितरण, मनपा प्रशासनाने दुर्लक्ष व हलगर्जीपणा केल्याने म्हशीचा मृत्यू झाला आरोप आबा हटकर यांनी करुन नुकसा भरपाई मिळावी अशी मागणी केली.

Protected Content