ममुराबाद येथे घरासमोर लावलेले ट्रॅक्टर लांबविले; पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शेतातील काम करून घरासमोर रोटाव्हेटरसह लावलेले ट्रॅक्टर मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याचे आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, रमाकांत आनंदराव शिंदे रा. उमा नगर, ममुराबाद ता.जि.जळगाव हे शेतकरी आहे. त्यांच्याकडे महिद्रा कंपनीचे लाल कलरचे (एमएच १९ सीव्ही ४८९१) क्रमांचे ट्रक्टर आहे. काल दिवसभर शेतात काम करून सायंकाळी रोटाव्हेटर लावलेले ट्रॅक्टर पुतण्याच्या घरासमोर लावले होते. रात्री ११ वाजेपर्यंत ट्रक्टर जागेवर होते त्यानंतर सर्वजण झोपले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी रोटाव्हेटरसह ट्रॅक्टर लांबविले. आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास ट्रॅक्टर चोरीस गेल्याचे उघडकीस आले. परिसरात शोधाशोध केली असता मिळून आले नाही. रमाकांत शिंदे यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास विलास शिंदे करीत आहे.

Protected Content