बँक खाते सील होणे सत्ताधाऱ्यांचा भोंगळ कारभाराचे लक्षण ; सुनील महाजन (व्हिडिओ )

WhatsApp Image 2019 06 27 at 4.36.03 PM

जळगाव (प्रतिनिधी) महापालिकेचे बँक खाते सिडकोच्या लीगल सेलने सील करणे हा मनपात सत्ताधाऱ्यांचा भोंगळ कारभार सुरू असल्याचे लक्षण असल्याचा आरोप मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी पत्रकार परिषदेत केला. याप्रसंगी गटनेते बंटी जोशी, शिवसेना महानगराध्यक्ष शरद तायडे, प्रशांत नाईक, गणेश सोनवणे आदी उपस्थित होते.

सन २०१४ मध्ये विधानसभा विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरेशदादा जैन यांच्या गटाची सत्ता असताना भाजपचे ज्येष्ठ नेते व तत्कालीन आयुक्त कापडणीस यांना हाताशी धरून तत्कालीन नगरसेवक तसेच विद्यमान आमदार सुरेश भोळे यांनी महापालिकेचे खाते सील करण्यात मोठी भूमिका बजावली होती असा गंभीर आरोप श्री. महाजन यांनीं लावला आहे. शहरात अराजकत, असंतोष निर्माण करण्याचे काम २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये केले होते. नियती सूड उगवत आहे. आज पुन्हा विधानसभेच्या निवडणुकी ३ महिन्यापूर्वी महापालिकेचे खाते सील झाले आहेत. सत्ताधारी गटाचे स्थानिक नेत्तृत्व विकास कामे न करता. टक्केवारीमध्य गुरफटले असल्याचा आरोप करण्यात आला. भाजपाने सत्तास्थापन करून १० महिने झाले तरी हुडकोच्या कर्जाकडे अक्ष्यम्य दुर्लक्ष करण्यात आले आहे. आ. भोळे शहरात अस्थिरता निर्माण करत आहेत. खाविआची सत्ता असतांना बँक खाते सील झाले होते तेव्हा राज्यात, केंद्रात सत्ता नसतांना तत्कालीन केंद्रीयमंत्री व्यंकायय नायडू यांची भेटून मार्ग खाते सील उघडण्याची प्रक्रिया केली होती. त्यावेळेस सर्व राजकीय परिसस्थिती खाविआच्या विरोधात होती असे श्री . महाजन यांनी सांगितले. आ. भोळे यांची केंद्रात, राज्यात, आणि महापालिकेत असतांना सुद्धा ही नमुष्मकी ओढवली असल्याचा आरोप श्री. महाजन यांनी केला . मुख्यमंत्री जळगाव शहरात आले असतांना त्यांनी विकास कामांसाठी २५ कोटींचा निधी दिला होता. तो अद्यापही आ. भोळे खर्च करू शकले नसल्याची खंत श्री. महाजन यांनी व्यक्त केली. प्रशासनांवर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी दिलेले आश्वासन ते पूर्ण करू न शकल्याने त्यांच्यावर नागरिकांनी भा.द.सं. कलम १९९ प्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. गाळेधारकांना खोटे आश्वासन दिल्याने गाळेधारकांनी त्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी आ. भोळे यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले .

Protected Content