चोपड्यात भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव उत्साहात

choda mahavir jayati

चोपडा (प्रतिनिधी)। भगवान महावीर स्वामीच्या जन्म कल्याणक महोत्सव चोपडा विविध कार्यक्रम करून उत्साहात साजरा करण्यात आले. सर्वप्रथम भगवान महावीर स्वामीच्या जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त सकल जैन समाजातर्फे भव्य शोभायात्रा चंद्रप्रभु दिंगबर जैन मंदिरातून काढण्यात आली. भगवान महावीर स्वामींच्या प्रतिमेची पालखी, व प्रतिमा ट्रॅक्टरवर सजविण्यात आले होते शोभायात्रेत सर्व जैन धर्मीय लोकांनीं सफेद वस्त्रं ,जैन धर्माची टोपी घातली होती तर महिलांनी लाल रंगाची साडी आणि गळयात जैन धर्मिय दुप्पटा टाकुन भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत पालखीचे पूजन ठिकठिकाणी होत होते शोभायात्रा राणी लक्ष्मीबाई चौक, पांचाळेश्वर गल्लीतील जैन तारण तारण जैन मंदिरात आरती करून गांधी चौक मार्गे मुनीसुव्रत स्वामी जैन मंदिरात पूजन करण्यात आले तेथून मेन रोड मार्गे परत आदिनाथ दिगबर जैन मंदिरात समारोप करण्यात आले शोभायात्रेत भवरलाल जैन यांच्या तर्फे शरबत देण्यात आले शोभायात्रेत ठिकठिकाणी नावयुतींनीकडून गरबा खेळण्यात आले. तसेच भगवान महावीर स्वामीच्या विविध घोषणा देण्यात आले. भगवान महावीर स्वामीच्या स्तुती गीतावर नवयुवकांनीही ठेका धरला. शेवटी प्रसाद वाटप करून शोभायात्रेचे समारोप करण्यात आले. शोभायात्रेत सकल जैन समाजाचे महिला, पुरुष, बालगोपाल सर्वच लोक उपस्थित होते.

पाणपोईचे उद्घाटन
येथील जैन समाजाच्या महिलांनी चालविले एक कदम आगे या नावाने नवीन ग्रुप सुरू केला आहे त्या ग्रुप मार्फत मेन रोडवर पाणपोईचे उद्धघाटन महावीर पतसंस्थाचे संस्थापक चेअरमन प्रा.शांतीलाल बोथरा यांच्या सह पत्नीक रेखा बोथरा यांच्याहस्ते करण्यात आले.

स्त्री रोग निदान शिबिराचे उद्घाटन
भारतीय जैन महिला संघटनाच्या व भाटिया हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमानाने स्त्री रोग निदान व संततीची शास्रक्रिया फक्त ५१००/- रुपयात आणि जनरल फी फक्त १०० /- रुपये ठेवण्यात आले होते येथे महावीर नागरी पतसंस्थाचे चेअरमन रेखाताई बोथरा यांच्याहस्ते करण्यात आले यावेळी भाटीया हॉस्पिटलचे डॉ.राजेंद्र भाटिया आणि भारतीय जैन संघटनेचे सर्व कार्यकर्ते हजर होते.

रक्तदान शिबीर
भारतीय जैन संघटने मार्फत आसकरण ताराचंद जैन रक्तपेढीत रक्तदात्याच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले संध्याकाळपर्यंत १९ लोकांनी रक्तदान करण्यात आले
भगवान महावीर स्वामीचा जन्म महोत्सव यशस्वी करण्यासाठी सकल जैन समाजाने मेहनत घेतली.

Add Comment

Protected Content