गैरसमजामुळे आदिवासी भागात कोरोना लसीकरणाला अल्प प्रतिसाद

 

 यावल : प्रतिनिधी । गैरसमजामुळे आदिवासी भागात कोरोना लसीकरणाला अल्प प्रतिसाद  असल्याचे मत लसीकरण यंत्रणेतील काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे

 

नवसंजीवनी कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सावखेडा सिम कार्यक्षेत्रात येणारे सातपुडा पर्वतातील, राज्याच्या सीमेवर, अतिदुर्गम व आदिवासी भागातील जामन्या तसेच हरिपुरा व परसाडे येथे कोविड लसीकरणास प्रारंभ करण्यात आला.

यावल तालुका आरोग्य आधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे, प्राथमिक आरोग्य केंद्र सावखेडासिमचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे व डॉ. नसीमा तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी भागात लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले.

आदिवासी भागात लसीकरणास आदीवासी नागरीकांच्या गैरसमजुतीमुळे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत म्हत्वाच्या अशा या शिबीरास अल्प प्रतिसाद मिळत असून १८ वर्षावरील व ४५ वर्षावरील  जामन्या येथे १५, हरिपुरा येथे १२, तर परसाडे येथे १४० असे एकूण १६७ नागरिकांना आदिवासी भागात कोविशील्ड लसीचा पहिला डोस देण्यात आला.

जामन्या येथे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत ब-हाटे  वैद्यकीय अधिकारी  डॉ. गौरव भोईटे, मानसेवी डॉ. प्रवीण ठाकरे, आरोग्य सहाय्यक लुकमान तडवी, आरोग्य सेवक अरविंद जाधव, आरोग्य सेविका शाबजान तडवी, शिवप्रताप घारू, व समीर तडवी तर परसाडे येथे सरपंच बबीताताई तडवी, उपसरपंच रुस्तम तडवी,  समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. साजिद तडवी व डॉ. राहुल गजरे. आरोग्य पर्यवेक्षिका शोभा चौधरी, आरोग्य सेवक भुषण पाटील, आरोग्यसेविका महमुदा तडवी, गटप्रवर्तक सरला तडवी, ग्रामसेवक मज्जित तडवी, ग्राम पंचायत सदस्या रहिमत तडवी,  हुसेन तडवी तर हरिपुरा येथे मोहराळा-हरिपुरा  सरपंच नंदाताई महाजन, उपसरपंच जहांगीर तडवी, परसाडे ग्रामपंचायत सरपंच बबीता तडवी , राष्ट्रपती पुरस्कार विजेते ग्रामसेवक मजीत अरमान तडवी ,  समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. रोशनआरा शेख, आरोग्य सेवक बालाजी कोरडे, आदी पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

लसीकरण शिबिरास आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी व जामन्या येथील वनाधिकारी अक्षय म्हेत्रे यांचे विशेष सहकार्य लाभले.

 

Protected Content