भारतीय जैन संघटनेचे कार्य कौतुकास्पद- अरुणभाई गुजराथी ( व्हिडीओ )

bjs chopda

चोपडा प्रतिनिधी । भारतीय जैन संघटनेचे कार्य हे समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहचत असून ते सर्वसामान्यांसाठी उपयुक्त असल्याचे गौरवोदगार विधानसभेचे माजी सभापती अरूणभाई गुजराथी यांनी काढले. ते भारतीय जैन संघटनेतर्फे आयोजित केलेल्या वह्या वाटपाच्या कार्यक्रमात बोलत होते.

भारतीय जैन संघटनेने कडून सोशल मीडियावर आवाहन केल्यानुसार लोकसभागातून गरीब, आदिवासी, मागासवर्गीय,होतकरू, विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम अरूणभाई गुजराथी यांच्या अध्यक्षतेखाली गेण्यात आला. यावेळी व्यासपीठावर चोपडा पिपल्स बँकचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी, पंचायत समितीचे गटसमनव्यक व ग.स.संचालक देवेंद्र पाटील, चोपडा,निमगव्हाण गटातील केंद्र प्रमुख युवराज पाटील, प्रा गोविंद गुजराथी,भारतीय जैन संघटनेचे तालुका अध्यक्ष क्षितिज चोरडीया महिला मंडळ शाळांचे प्राचार्य सुनील चौधरी आदी उपस्थित होते. गट समनव्यक देवेंद्र पाटील यांनी आपल्या मनोगतात बोलताना सांगितले की, भारतीय जैन संघटनाचे कार्य हे लोकाभिमुख आहे. मूल्यवर्धन शिक्षण पद्धत, नालाखोलीकरण, भूकंपसाठी पुनर्वसन, शेतकरी आत्महत्याग्रस्त मुलांना मोफत शिक्षण, बिजनेस डेव्हलपमेंट, महिला सक्षमीकरण असे अनेक कार्य राष्ट्रीय स्थरावरील असून स्थानिक पातळीवर आरोग्य शिबीर, अनाथ मुलांना कपडे वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप, असे अनेक उपक्रम सुरू असतात.

अध्यक्षीय भाषणा अरूणभाई गुजराथी म्हणाले की, सर्व सामान्यांसाठी अनेक योजना शासनाच्या देखील येत असतात. याशिवाय, अनेक सामाजिक संस्था देखील तळागाळातील लोकांना मदत करण्यासाठी पुढे येत असतात. परंतु त्या शासकीय योजना, व ती मदत सर्व सामान्य पर्यंत पोहचतच नसते मात्र भारतीय जैन संघटनेचे कोणतेही कार्य असले तरी ते फक्त आणि फक्त सर्व सामान्यांपर्यंतच पोहचवत असते. संघटनेचे कार्यकर्ते हे सर्व सामान्य परिस्थितीतुन आलेले असतात म्हणून त्यांचे कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहचते असे गौरवदगार अरुणभाई गुजराथी यांनी काढले

दरम्यान, या कार्यक्रमात मॉडर्न गर्ल स्कुल, सदगुरू कन्या विद्यालय, म्युनिसिपल हायस्कूल, कस्तुरबा माध्यमिक विद्यालय, महिला मंडळ विद्यालय, जि. प. शाळा क्रमांक एक ते तीन, मुस्तफा अँग्लो उर्दु स्कुल, प्रताप विद्या मंदिर नागलवाडी , कमला नेहरु वसतिगृह , सावता माळी वसतिगृह, महात्मा गांधी विद्यालय, सत्रासेन आश्रम शाळा, उमर्टि आश्रम शाळा, बोरअजटी आश्रम शाळा, जय श्री दादाजी हायस्कूल तांदळवाडी, जि. प.शाळा विषणापूर, जि. प.शाळा जिरायतपाडा, जि. प.शाळा कारखाना, सातपुडा आदिवासी जनता वसतिगृह, जि. प.कन्या विद्यालय आदी शाळांना मान्यवरांच्याहस्ते वह्या वाटप करण्यात आले

या कार्यक्रमासाठी सुभाषचंद्र बरडीया, सुगनचंद बोरा, रमेश राखेचा,डॉ. तेजपाल चोरडीया, नरेश लोडाया, उमेदमल टाटीया, अ‍ॅड.अशोक जाधव, जीवनलाल ब्रम्हचा, दिलीप बरडीया, पारस आटो सेंटर ,स्व वामनरावभाऊ फ्रुट सेल सोसायटी, नंदकिशोर देशमुख (सर), रमेशभाई नागदेव, करसनदास नानाजीभाई मिठाईवाले, बाबूलाल बोथरा, दिनेश बरडीया, नवलबाई भिकमचंदजी बरडीया, राजेंद्र मेहेर अडावद, ललित टाटीया, सुरेशचंद दर्डा, प्रा.गौतम छाजेड, सुनील प्रेमचंदजी बरडीया, सौ शोभाबाई चोपडा, गौतम सांड, विनोद पालिवाल, अनिल बुरड, संजीव बाविस्कर, प्रकाशचंद सुराणा, सुगनचंद सांड, चंद्रकांत जैन, अमृत अप्पा वाघ, ए.डी.चौधरी, डॉ.आर.टी. जैन, हेमंत छाजेड, धिरेंद्र जैन, नमन मोबाईल, निखील भदाणें (पूणे), सुरेश राखेचा, अनुप जैन आदींनी मदत केली.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघटनेचे सचिव दिनेश लोडाया, जिल्हा उपाध्यक्ष शांतीलाल कोचर, तालुका उपाध्यक्ष विपुल छाजेड, कोष्याध्यक्ष निर्मल बोरा, जितेंद्र बोथरा, दिपक राखेचा, आनंद आचलिया, आदेश बरडीया, अभय ब्रम्हचा, आकाश सांड, आदिंनी सहकार्य केले. सूत्रसंचालन संजय बारी तर आभार प्रदर्शन लतीश जैन यांनी केले.

Protected Content